बीड : अजोळी गेलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर नराधम आजोबाने केले अत्याचार, गुप्तांगाला...
Beed crime : बीडच्या केज तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अजोळी गेलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर नराधम आजोबाने अत्याचार केला आहे. ही घटना केजमधील युसुफवडगाव पोलीस ठाणे परिसरात घडली होती, या घटनेनं तालुका हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आजोळी आलेल्या नातीवर आजोबाकडून अत्याचार
लेकीने बापाविरोधात पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल
Beed Crime : योगेश काशिद - बीडच्या केज तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अजोळी गेलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर नऱाम आजोबाने अत्याचार केला आहे. ही घटना केजमधील युसुफवडगाव पोलीस ठाणे परिसरात घडली होती. या घटनेनं तालुका हादरून गेला आहे, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना 16 ते 25 एप्रिलदरम्यान घडली आहे.
हे ही वाचा : दारूत मिसळण्यास पाणी न दिल्याने 9 वर्षाच्या मुलाची गोळी झाडून हत्या, बारश्याच्या कार्यक्रमात उडाली खळबळ...
आजोळी आलेल्या नातीवर आजोबाकडून अत्याचार
बीडच्या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहित तरुणी आपल्या माहेरी आली होती. ती माहेरी आली असता, त्या विवाहित तरुणीच्या वडिलांनी स्वत:च्याच तीन वर्षाच्या नातीवर अत्याचार केला. नराधम आजोबाने तिच्या गुप्तांगाला चुकीचा स्पर्श केल्याची घटना आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.
लेकीने बापाविरोधात पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल
या प्रकरणात आईने युसुफवडगाव पोलीस ठाणे गाठले आणि नराधम आजोबावर पोक्सो अंतर्गत 4,6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील गुन्हा दाखल होताच, पिंक पथताने पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी 1 मे 2026 रोजी नराधम आजोबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात आली आहे.
हे ही वाचा : पुणे : 3 वर्षीय चिमुरड्याची बलात्कार करुन निर्घृण हत्या, बॅगेत लपवला मृतदेह; अल्पवयीन आरोपीला अटक
दरम्यान, राज्यात महिला, मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. महिला-मुली केवळ सामाजिक ठिकाणीच नाही,तर आता त्या घरातच देखील सुरक्षित नाहीत. नराधम नातेवाईकांकडून मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू लागलेल्या आहेत.









