'आरक्षणावर सरकार कसलाही तोडगा...' सोशल मीडियावर पोस्ट अन् राहत्या घरात मराठा तरुणाने संपवलं आयुष्य

Maratha Reservation : एका मराठा बांधवाने 30 ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना आंबेजोगाई तालुक्यातील आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव नितीन माणिकराव चव्हाण असे आहे.

maratha reservation
maratha reservation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली

point

सरकार आरक्षणावरती तोडगा काढेना

point

तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना सोबत घेत 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली. मुंबईकडे येतानाच एका मराठा बांधवाला हृदयविकाराचा झटका आला. त्याचं सतीश ज्ञानोबा देशमुख (वय 45) असे होते. त्यानंतर मनोज जरांगे हे आझाद मैदानावर पोहोचले आणि त्यानंतर एका मराठा बांधवाने 30 ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना आंबेजोगाई तालुक्यातील आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव नितीन माणिकराव चव्हाण असे आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange Patil : ‘फडणवीसनं दोन खून केलेत’, जरांगे-पाटलांची स्फोटक मुलाखत

गळफास घेत आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाने टोकाचं पाऊल उचललं गेल्याचं बोललं जात आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आत्महत्येचं कारण सांगितलं. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिलं की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू आहे.

या आंदोलनात अद्यापही कोणताही तोडला निघालेला नसल्याने नैराशात येऊ गळफास घेत तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागल्या आहेत. तरुणाच्या जाण्याने सुगावात शोककळा पसरली आहे. मराठा आरक्षणासाठी नितीन चव्हाण या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती होता मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेल्या 70 ते 80 तरुण सुगावाकडे परतले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : बुध ग्रहाचा केतू नक्षत्रात प्रवेश, काही राशीतील लोकांना पैशाची कमी पडणार नाही, काय सांगतं राशीभविष्य?

आंदोलकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

या आंदोलनात सामिल झालेल्या एका आंदोलकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निधन झालेल्या आंदोलकाचे नाव सतीश ज्ञानोबा देशमुख (वय 45) असे  होते. ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वारपगंजचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं मराठा बांधवांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp