ऑनर किलिंगनं पुणे हादरलं! लग्नाची बोलणी करायला घरी बोलावलं, नंतर खोलीत नेलं आणि...

pune crime : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सांगवीत ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने तरुणाला मुलीच्या घरच्यांनी बोलावले आणि नंतर बेदम मारहाण केली.

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी-चिंचवडमधील सांगवीत ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार

point

लग्नाच बोलणी करायला बोलावलं आणि तरुणाला मारहाण

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सांगवीत ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने तरुणाला मुलीच्या घरच्यांनी बोलावले आणि नंतर बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं पिंपरी चिंचवडमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange Patil : ‘फडणवीसनं दोन खून केलेत’, जरांगे-पाटलांची स्फोटक मुलाखत

नेमकं काय घडलं? 

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबाने लग्नाबाबत बोलणी करण्याचं कारण सांगून तरुणाला घरी बोलावले. त्यानंतर त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. रामेश्वर घेंगट (वय 26) असे मयत तरुणाचं नाव आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, तरुणीच्या वडिलांसह इतर नऊ जणांनी अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघेजण अद्यापही फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित प्रकरणात पोलिसांनी महिलेचे वडील प्रशांत सारसरसह इतर 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर घेंगटला मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. इतर दोघाजणांचा शोध सुरु आहे, असे सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितलं.

लग्नाची मागणी घालण्याच्या प्रस्तावावर तरुणाला घरी बोलावले अन्...

दोघांनीही लग्न करण्याचा हट्ट धरला होता. यामुळे तरुणीच्या कुटुंबाने लग्नाची मागणी घालण्याच्या प्रस्तावावर तरुणाला घरी बोलावले, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण त्याच्या कुटुंबासह तरुणीच्या घरी भेटण्यास गेला होता. तेव्हा दोन्ही कुटुंबात वादविवाद झाला. तरुणीच्या वडिलांनी आणि इतर लोकांनी रामेश्वरला एका खोलीत नेले आणि बेदम मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा : नाद करती काय?! 500 केळी, 100 बिसलेरी बॉक्स... हॉटेल तिरंगाच्या मालकाकडून मुंबईतील मराठा आंदोलकांना ट्रकभरून जेवणाची मदत

या बेदम मारहाणी तरुण रामेश्वर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नाने त्याला वाचवण्यात यश आलं. पीडितेनं कुटुंबाने तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. हा एकूण प्रकार 22 जुलै रोजी घडल्याचा पीडित तरुणाच्या कुटुंबाने दावा केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp