Govt Job: 10 वी पास तरुणांसाठी रेल्वे बोर्डाकडून मोठी भरती! कोणतीच परीक्षा नाही अन्... कसं कराल अप्लाय?
रेल्वे भरती सेल (RRC) कडून 2800 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

बातम्या हायलाइट

रेल्वे भरती सेल (RRC) कडून मोठी भरती!

10 वी पास तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची संधी...
Railway Recruitment 2025: सरकरी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती सेल (RRC) कडून 2800 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
एकूण 2865 रिक्त पदांसाठी भरती जाहीर
रेल्वे भरती सेल (RRC)ने पश्चिम-मध्य रेल्वे (WCR) मधील रिक्त जागांसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती करणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेन्टिस पदांच्या एकूण 2865 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 29 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
'या' पदांसाठी भरती
पश्चिम-मध्य रेल्वे (WCR)च्या वेगवेगळे यूनिट आणि वर्कशॉपमधील रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये लोहार, इलेक्ट्रिशिअन, फिटर, मॅकेनिक, प्लंबर, वेल्डर आणि वायरमॅन सारख्या बऱ्याच पदांचा समावेश आहे.
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह 10 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच, अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसेच, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 20 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय 15 वर्षांपेक्षा जास्त आणि 24 वर्षांपेक्षा कमी असावे. म्हणजेच किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन
कोणत्याही परीक्षेशिवाय होणार भरती
रेल्वेमध्ये अप्रेन्टिस पदांसाठी कोणत्याच परीक्षेचं आयोजन केलं जाणार नाही. यामध्ये उमेदवारांची नियुक्ती 10 वी आणि आयटीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल. गुणांच्या आधारे उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वेच्या नियमांनुसार स्टायपेंड दिलं जाईल.
कसं कराल अप्लाय?
1. सर्वप्रथम RRC पश्चिम-मध्य रेल्वेच्या wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर होमपेजवरील 'Recruitment' टॅबवर क्लिक करा आणि 'Engagement Of Act Apprentices' ही लिंक उघडा.
3. यामध्ये तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि इतर माहिती भरा.
4. आता 10 वी उत्तीर्ण असल्याचं सर्टिफिकेट, पासपोर्ट साइझ फोटो, सही, आयटीआय सर्टिफिकेट असे आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
5. अर्जाचं शुल्क जमा करा आणि ते सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या.
हे ही वाचा: नागरिकांनो सावधान! गटारीच्या पाण्यात भाज्या धुवून विक्री... धुळ्यातील भाजीविक्रेत्याचा किळसवाणा प्रकार
अर्जाचं शुल्क
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी एससी (ST)/एसटी (SC) तसेच महिला उमेदवारांना 41 रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 141 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. अर्जाचं शुल्क केवळ ऑनलाइन माध्यमातून स्विकारलं जाईल. उमेदवारांना भरतीसंदर्भात नवीनतम अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.