गोरी बनवण्याचं आमिष दाखवलं अन् घातक केमिकलने जाळलं! पतीने केलं पत्नीसोबत भयंकर कृत्य...
उदयपूर जिल्ह्यातील न्यायालयाकडून पत्नीची निर्घृण हत्या केल्याबद्दल आरोपी पतीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

बातम्या हायलाइट

पतीने पत्नीला दाखवलं गोरी होण्याचं आमिष...

पत्नीला घातक केमिकलने जाळलं! पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य...
Crime News: उदयपूर जिल्ह्यातील न्यायालयाकडून एका धक्कादायक प्रकरणात कठोर निकाल देण्यात आला आहे. पत्नीची निर्घृण हत्या केल्याबद्दल न्यायालयाने आरोपी पतीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपी पतीला 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. एका महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचं मन हेलावून टाकणारं वृत्त समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
न्यायालयाने या गुन्ह्याला 'रेअर ऑफ द रेअरेस्ट' म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ मानलं. आरोपी पती त्याच्या पत्नीला तिच्या रंग आणि लठ्ठपणाबद्दल सतत टोमणे मारत असल्याचं तपासात समोर आलं. अशाप्रकारे पीडितेचा पतीकडून दररोज छळ केला जात होता. एके दिवशी, पतीने पत्नीला एक खास केमिकल लावल्याने ती गोरी होईल,असं सांगून तिची फसवणूक केली. पत्नीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते केमिकल तिच्या संपूर्ण शरीरावर लावलं. त्याच वेळी, त्यानंतर आरोपीने जळत्या अगरबत्तीने तिला आग लावली आणि बाटलीतील उरलेले केमिकल पत्नीच्या जळत्या शरीरावर ओतलं. त्यामुळे तिचा अतिशय वेदनादायी पद्धतीने मृत्यू झाला.
हे ही वाचा: पवित्र रिश्ता फेम मराठीमोळी अभिनेत्री 'प्रिया मराठे'चं निधन
घृणास्पद आणि मानवतेला काळीमा फासणारा गुन्हा
प्रकरणाचा निकाल सुनावत असताना कोर्टाने हा गुन्हा अत्यंत घृणास्पद आणि मानवतेला काळीमा फासणारा असल्याचं सांगितलं. अशा प्रकरणांमध्ये कोणतीही सौम्यता समाजाला धोकादायक संदेश देऊ शकत असल्याचं सांगितलं गेलं. न्यायालयाने आरोपी किशनलालला मरेपर्यंत फाशी देण्याचा आदेश दिला.
हे ही वाचा: रात्री पत्नीसोबत झालं भांडण अन् सकाळी पतीसोबत घडला धक्कादायक प्रकार... नेमकं काय घडलं?
हा निर्णय न्यायालयांच्या झीरो टॉलरेन्स म्हणजेच शून्य सहनशीलतेच्या धोरणाचं प्रतिबिंब आहे. महिलांवरील अमानुष गुन्ह्यांसाठी कायदा सर्वात कठोर शिक्षा देईल असा स्पष्ट संदेश यातून मिळतो. ही केवळ शिक्षा नाही तर संपूर्ण समाजाला सूचित करण्यात आलं आहे की असा विचार आणि असे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत.