पहिली बायको गेली सोडून, दुसरीची केली हत्या... जेलमधून बाहेर आल्यानंतर तिसऱ्या महिलेशी लग्न अन् तिला सुद्धा...
बिहारच्या दरभंगा परिसरात लग्नाच्या एक वर्षानंतर आरोपी तरुणाने तिसऱ्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

पहिली बायकोला सोडलं अन् दुसऱ्या पत्नीची केली हत्या

जेलमधून बाहेर आल्यानंतर तिसऱ्या महिलेशी लग्न अन् तिला सुद्धा...
Crime News: बिहारच्या दरभंगा परिसरात एका पतीच्या जाचाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर संबंधित तरुणाने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं आणि तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली तो तुरुंगात गेला. त्यावेळी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने तिसरं लग्न केलं. मात्र, लग्नाच्या एक वर्षानंतर त्या तरुणाने तिसऱ्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही हृदयद्रावक घटना संबंधित परिसरातील रानीपुर बेला गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रकरणातील आरोपी प्रमोद पासवान सध्या फरार असल्याचं सांगितलं जात आहे.
पत्नीवर लोखंडी रॉडने वार करत हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्टच्या रात्री आरोपी प्रमोदने झोपलेल्या अवस्थेत असताना 19 वर्षीय विभा कुमारीके नावाच्या त्याच्या पत्नीवर लोखंडी रॉडने वार केला. यामुळे विभा गंभीर पद्धतीने जखमी झाली. पत्नीच्या हत्येनंतर प्रमोद घटनास्थळावरून पळून गेला. घरच्या सदस्यांनी विभाला गंभीर अवस्थेत पाहिलं आणि तिला तातडीने उपचारासाठी डीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या गंभीर प्रकृतीमुळे तिला पाटणा येथे रेफर करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान पाटणाच्या खाजगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: 3 भावांनी मिळून 7 वर्षांच्या निष्पाप बहिणीवरच केला बलात्कार! शेतात पीडितेच्या मागोमाग गेले अन्...
हुंडाबळीचा गुन्हा केला दाखल
विभाच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय तिचा मृतदेह घेऊन रानीपुरमध्ये पोहोचले. या प्रकरणासंदर्भात पीडितेचे वडील जीवछ पासवान यांनी त्यांचा जावई प्रमोद पासवान याच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. एक वर्षापूर्वी विभाचं लग्न प्रमोदसोबत झाल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली. लग्नाला काही दिवस झाल्यानंतर हुंड्याच्या कारणावरून प्रमोद विभाला सततत मारहाण करत असल्याचा आरोप विभाच्या वडिलांनी केला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? मोठी अपडेट आली समोर... भारताचे राजदूत काय म्हणाले?
तिसऱ्या पत्नीची देखील केली हत्या...
पत्नीची हत्या करणारा आरोपी प्रमोद पासवान अतिशय विक्षिप्त स्वभावाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी त्याला तुरुंगात देखील पाठवण्यात आलं होतं. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपीच्या विक्षिप्त स्वभावाला कंटाळून त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्याचं दुसरं लग्न झालं होतं. दुसरं लग्न झाल्याच्या काही दिवसांनंतर त्याने त्याच्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली होती. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपी तरुणाने तिसरं लग्न केलं आणि तिची देखील पतीने हत्या केल्याचं वृत्त समोर आलं.