मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? मोठी अपडेट आली समोर... भारताचे राजदूत काय म्हणाले?
भारतीय राजदूत सीबी जॉर्ज यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टबद्दल जपानमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे.

बातम्या हायलाइट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार?

भारतीय राजदूत सीबी जॉर्ज यांनी दिली माहिती..
Mumbai News: देशातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? असा प्रश्न प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात येत असतो. बऱ्याच काळापासून लोक याची वाट पाहत आहेत. भारतीय राजदूत सीबी जॉर्ज यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेबद्दल जपानमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2027 मध्ये सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गुजरातचं सर्वात मोठं शहर अहमदाबादच्या साबरमती स्टेशनपासून मुंबईच्या वांद्रे स्थानकापर्यंत बुलेट ट्रेनच्या कॉरिडोरची निर्मिती केली जात आहे. या प्रोजेक्टचं काम गुजरातमधील सुरत-बिलिमोरा जवळ पोहोचलं असून येथे ट्रायल रन म्हणजेच चाचणी धावा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारताचा बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रोजेक्ट
पंतप्रधान मोदी यांच्या जपान दौऱ्याच्या आधी जॉर्ज यांनी सीएनएन-न्यूज 18 सोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की भारतातील पायाभूत सुविधांच्या परिवर्तनात जपानची महत्त्वाची भूमिका आहे. भारताचा बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पूर्णपणे मार्गी लागला असून मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर 2027 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं जॉर्ज यांनी सांगितलं.
हे ही वाचा: Govt Job: 'ऑइल इंडिया'मध्ये निघाली बंपर भरती! पगार तर लाखोंच्या घरात... काय आहे पात्रता?
भारताचे राजदूत सिबी जॉर्ज काय म्हणाले?
जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानला भेट देणार आहेत. दरम्यान, जॉर्ज म्हणाले की, "मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की 2027 पर्यंत त्या कॉरिडॉरवर एक ट्रेन धावेल. मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. जपान जेव्हा E5 आणि E3 शिंकानसेन ट्रेन पुरवेल तेव्हाच भारतात बुलेट ट्रेन धावेल." पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान डिलिव्हरी प्रक्रिया पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा: गर्लफ्रेंड म्हणाली, "माझ्याशी बोलूच नकोस..." बॉयफ्रेंड संतापला अन् थेट कॉलेजसमोर जाऊन... नेमकं काय घडलं?
भारताचा ड्रीम प्रोजेक्ट...
2014 मध्ये पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी स्थापन केली. या अंतर्गत भारतात बुलेट ट्रेन चालवण्याचं स्वप्न पाहिलं गेलं. मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन 508 किमीचा प्रवास तीन तासांत पूर्ण करेल. या प्रकल्पाचं नाव मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) असं आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनचा कमाल वेग 350 किमी/तास असेल. बुलेट ट्रेनचा 7 किमीचा भाग समुद्राखाली असेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः या प्रकल्पाचा आढावा घेत आहेत. त्यांनी अनेक वेळा त्याची पाहणी केली आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवणे हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर असल्याचं सांगण्यात येत आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणाऱ्या 21 पुलांपैकी 17 पूलांचं काम पूर्ण झालं आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये 25 नदी पूल आहेत, त्यापैकी 21 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात असल्याची माहिती आहे.