पत्नीने शेजाऱ्यासोबत केलं लग्न..पतीची सटकली! चाकूने सपासप वार करून बायकोच्या BF ला संपवलं, त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या उन्नाव येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि दुसऱ्या लग्नामुळे नाराज झालेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.

बातम्या हायलाइट

पत्नीचे शेजाऱ्याशी होते अनैतिक संबंध

पतीने चाकूने वार करत प्रियकराला संपवलं

आरोपी चाकू घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि..
Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या उन्नाव येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि दुसऱ्या लग्नामुळे नाराज झालेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. मृताच्या छोट्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हत्येची घटना घडल्यानंतर आरोपीने चाकूसह पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर केलं आहे. पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला कोर्टात हजर केलं. त्यानंतर आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आलं.
ही धक्कादायक घटना कासिमनगर परिसरात घडली. इरफानने पोलिसांना सांगितलं की, या परिसरात राहणाऱ्या नौशादची पत्नी इरफानाने काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेत माझा भाऊ नूर आलमसोबत लग्न केलं होतं. यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये वादविवाद सुरु होते. गुरुवारी उशिरा रात्री नौशादने घराच्या बाहेर बसलेल्या नूरवर चाकूने वार करत त्याची हत्या केली. माझ्या आणि बहीणीच्या समोरच हत्येची घटना घडली. आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला पण आरोपी फरार झाला.
हे ही वाचा >> लग्नानंतर 6 महिने नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर, पती संतापला अन्... प्रेमविवाह होऊन सुद्धा काय घडलं?
आरोपी चाकू घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि..
हत्येच्या घटनेनंतर आरोपी नौशाद चाकू घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्यावेळी चौकशीदरम्यान त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला. चाकूचे वार केल्यामुळे गळा आणि पोटातील आतड्या फाटल्या. त्यामुळे नूर आलमचा मृत्यू झाला, असं पोस्टमार्टमध्ये समोर आलंय.
मृत नूर आलम सोशल मीडियावर सक्रीय होता. तो नेहमी फेसबुक, व्हाट्सअॅपवर प्रेमप्रकरणाच्या पोस्ट शेअर करायचा. कुटुंबियांच्या माहितीनुसार, मृत नूर आलमने त्याची पहिली पत्नी रमजानूसोबत लग्न केलं होतं. तर नौशादची पत्नी इरफानाने कोर्टात दुसरं लग्न केलं होतं. दरम्यान, नूर आलमची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.