3 भावांनी मिळून 7 वर्षांच्या निष्पाप बहिणीवरच केला बलात्कार! शेतात पीडितेच्या मागोमाग गेले अन्...
उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आपल्या चुलत बहिणीसोबतच घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

7 वर्षांच्या निष्पाप बहिणीवरच केला बलात्कार!

3 भावांनी मिळून अल्पवयीन पीडितेसोबत केलं घृणास्पद कृत्य...
Crime News: उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधून नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आपल्या चुलत बहिणीसोबतच घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींना अटक करून बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. संबंधित घटना ही गाझीपूरच्या सैदपूर ठाणे परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
सैदपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात एक 7 वर्षांची निष्पाप मुलगी घरात शौचालय नसल्याकारणाने शौचासाठी शेतात जात होती. त्याच वेळी 11 वर्षांचा तिचा चुलत भाऊ तिच्या मागोमाग शेतात गेला. त्याच्यासोबत त्याचे दोन अल्पवयीन मित्र देखील होते. ती दोन मुलं सुद्धा नात्याने पीडितेचे चुलत भाऊ लागतात. त्यावेळी शेतात एकांताचा फायदा घेऊन भावाने आपल्या बहिणीवर बलात्कार केला. त्यानंतर, आरोपी भावाच्या दोन्ही मित्रांनी मिळून सुद्धा पीडितेवर बलात्कार केला.
पीडितेच्या आईने सांगितली घटना
पीडिता तिच्या घरी पोहोचल्यानंतर तिने तिच्या आईला संपूर्ण घटना सांगितली. या घटनेची माहिती मिळताच तिच्या आईला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मोठा धक्का बसला. तसेच, आरोपी मुलगा नात्याने पीडितेचा चुलत भाऊ असल्याने सर्वच हादरले.
पीडितेच्या आईने आधी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार केली. त्यानंतर तिने सैदपूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तिन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली, त्यानंतर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यांचा शोध सुरू केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर, एका खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींना एका चहाच्या टपरीवर पकडलं.
अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठवलं..
यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत त्यांच्यावर कारवाईची सुरूवात करण्यात आली. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात येऊन त्यांची चौकशी केली. यानंतर, शुक्रवारी (28 जुलै) दुपारी 12 वाजता तिघांनाही मेजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं. तिथून तिन्ही आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.