आरारारारा खतरनाक! एक नवरा..10 लग्न अन् 10 वेळा हनिमून! 9 बायका सोडून गेल्या पण दहाव्या बायकोसोबत घडलं सर्वात भयंकर..
Today viral News : छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यात एक आगळीवेगळी घटना घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे एका व्यक्तीने 1-2 नाही, तर दहावेळा लग्न केल्याचं उघडकीस आलं आहे. पण असं का घडलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बातम्या हायलाइट

पतीनं 10 व्या पत्नीची हत्या केली

आरोपीचा असा झाला पर्दाफाश

त्या गावात नेमकं काय घडलं?
Groom And Bride Shocking News : छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यात एक आगळीवेगळी घटना घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे एका व्यक्तीने 1-2 नाही, तर दहावेळा लग्न केल्याचं उघडकीस आलं आहे. पण असं का घडलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे धक्कादायक प्रकरण आहे तरी काय? जाणू घ्या सविस्तरपणे..धुला नावाचा हा व्यक्ती जशपूरच्या सुलेसा गावात राहतो.
संसार सुरु करण्याच्या इच्छेमुळं या व्यक्तीने 10 वर्षात नऊवेळा लग्न केलं. पण एकही मुलगी त्याच्यासोबत टीकली नाही. प्रत्येक वेळी पत्नी त्याला सोडून गेली. तो पत्नीवर संशय घ्यायचा. त्यांना मारायचा. त्याचं कोणतंही लग्न सहा महिन्यांपेक्षा जास्त टीकलं नाही. अखेर त्याच्या जीवनात दहा महिला आल्या. धुला नावाचा व्यक्ती दहाव्यांदा नवरा बनला. पण 10 व्या पत्नीसोबत असं काही केलं, जे वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
हे ही वाचा >> शेतावर गवत कापायला गेली अन् होत्याचं नव्हतं झालं! नाग-नागिणच्या सर्पदंशामुळे महिलेचा जीव गेला, सापांचाही झाला मृत्यू, कारण..
10 व्या पत्नीची हत्या केली
धुला नावाचा हा व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत एका लग्नात गेला होता. धुला याला संशय आला की, त्याच्या पत्नीनं लग्नातून धान्य, तेल आणि एक साडी चोरली. यामुळे दोघांमध्ये वादविवाद सुरु झाले. प्रकरण इतकं वाढलं की, रागाच्या भरात त्याने दहाव्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. हे घाणेरडं कृत्य त्याने याचवर्षी एप्रिल महिन्यात केलं.
असा झाला पर्दाफाश
त्यानंतर धुला नावाच्या या व्यक्तीनं गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जंगलात सुक्या पानांमध्ये लपवून ठेवला. जवळपास 4 दिवसांपर्यंत मृतदेह जंगलातच सडला आणि दुर्गंधी पसरली. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तपासादरम्यान आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला.