Maratha Reservation: मनोज जरांगेंशी चर्चा करायला शिंदे समिती आझाद मैदानावर आली, पण...
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. पाहा या चर्चेत नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

Manoj Jarange Latest News: मुंबई: मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी कालपासून (29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे. यानंतर सरकारने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शिंदे समितीच्या सदस्यांना आझाद मैदानावर पाठवलं होतं. पण यावेळी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली. त्यामुळे शिंदे समितीला तसंच माघारी परतावं लागलं.
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली आहे. ती समिती मराठी समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम करत आहेत. अशावेळी याच समितीच्या सदस्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या पुन्हा एकदा समजून घेतल्या. जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी समितीचे बरेच प्रयत्न सुरू होते. मात्र, आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं जरांगेंनी ठामपणे सांगितलं.
हे ही वाचा>> Maratha Reservation: मनोज जरांगे मुंबईत येताच CM फडणवीस काय म्हणाले?, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
शिंदे समितीसोबत नेमकी काय झाली चर्चा?
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी ते हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट तसेच सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी करत आहेत.
शिंदे समितीने जरांगे यांनी मराठा गॅझेट शोधण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली पण जरांगे यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. 13 महिने मुदत दिली आता आणखी किती मुदत तुम्हाला हवी? असा सवालही त्यांनी यावेळी केला.









