Maratha Reservation: मनोज जरांगे मुंबईत येताच CM फडणवीस काय म्हणाले?, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
CM Devendra Fadnavis on Manoj Jarange hunger strike: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषणाला सुरूवात केली आहे. ज्याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट केलं आहे.'
ADVERTISEMENT

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी हजारो आंदोलकांसह थेट मुंबईत धडक मारली आहे. मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी आता थेट मुंबईत येऊन जरांगेंनी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच सगळ्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'आमचं सरकार सगळ्या समाजाने निवडून आणलं आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाला सांभाळावं लागेल. कोणावरही अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत त्यांची सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे मुंबईत.. वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
'मला असं वाटतं की, आज सकाळी आंदोलक आले आहेत. मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी देखील सर्वांना आवाहन केलं आहे की, आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे. सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. शासनाची भूमिका पण सहकार्याचीच आहे. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की, लोकशाही पद्धतीने एखादं आंदोलन चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही. कारण चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्यातीलच एक मार्ग असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीने आम्ही करतो आहोत. विशेषत: उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, सगळं सहकार्य चाललं आहे.'
हे ही वाचा>> 'आता पाटील म्हणतील तसं..', अखेर मनोज जरांगे आझाद मैदानावर धडकले, मराठा आंदोलकांचा मुंबईत एल्गार
'हे खरं आहे की, तुरळक प्रमाणात काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केला, ट्रॅफिक जाम केलं.. पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणीही आंदोलकांनी सहकार्य केलं आणि त्या-त्या जागा मोकळ्या केल्या आहेत.'