पत्नीच्या हत्येपूर्वी WhatsApp वर 'भावपूर्ण श्रद्धांजली'चा मेसेज केला, नंतर पतीने पत्नीच्या छातीवर, पोटावर अन् पाठीवर वार केले अन्..
Husband Killed Wife : राज्यातील परभणी जिल्ह्यात एका पतीने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील टांडा येथे हत्येची ही धक्कादायक घटना घडली. विद्या असं मृत महिलेचं नाव आहे.

बातम्या हायलाइट

पत्नीच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर केले वार

पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Husband Killed Wife : राज्यातील परभणी जिल्ह्यात एका पतीने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील टांडा येथे हत्येची ही धक्कादायक घटना घडली. विद्या असं मृत महिलेचं नाव आहे. तर महिलेची हत्या करणाऱ्या आरोपी पतीचं नाव विजय राठौड असं आहे. हत्या करण्यापूर्वी आरोपीने पत्नीला व्हाट्सअॅपवर भावपूर्ण श्रद्धांजली असा मेसेज सेंड केला होता.
या हत्याप्रकरणामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्याच्या वाघीमध्ये राहणाऱ्या विजय राठोडचं लग्न सोनपूर टांडा येथील विद्यासोबत झालं होतं. तीन-चार दिवसांपूर्वी विद्या आणि विजय यांच्यात वादविवाद झाला होता.
पत्नीच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर केले वार
पती-पत्नीत झालेल्या वादविवादानंतर विद्या तिच्या मामाच्या घरी राहायला गेली होती. पण गुरुवारी विद्या तिच्या वडिलांच्या शेतात गेली होती. तेव्हा तिचा पती विजय तिथे आला. त्यानंतर त्या दोघांमध्ये वादविवाद सुरु झाले. त्यानंतर रागाच्या भरात विजयने त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने तिच्या डोक्यावर, पोटावर आणि पाठीवर 10-12 वार केले.
हे ही वाचा >> सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत CM देवेंद्र फडणवीस शेवटच्या स्थानी..MOTN सर्व्हेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ!
यामुळे विद्या गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर कुटुंबियांनी जवळपासच्या लोकांच्या मदतीने तिला जिंतूरच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉ. प्रमोद पारवे यांनी विद्याला मृत घोषित केलं. विद्याच्या हत्येमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी मागणी केली की, विद्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला तातडीनं अटक केली पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे.