मुंबईची खबर: प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वेचा मोठा निर्णय! 54 रेल्वे स्थानकांवर सुरु होणार डिजीटल सेवा...

रेल्वेच्या सेवेत डिजीटल बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात मुंबईतील काही स्थानकांवर संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

54 रेल्वे स्थानकांवर सुरु होणार डिजीटल सेवा!
54 रेल्वे स्थानकांवर सुरु होणार डिजीटल सेवा!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वेचा मोठा निर्णय!

point

54 रेल्वे स्थानकांवर सुरु होणार डिजीटल सेवा...

Mumbai News: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या सेवेत डिजीटल बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात मुंबईतील काही स्थानकांवर संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील 22 स्थानके आणि मध्य रेल्वे मार्गावरील 32 स्थानकांचा समावेश आहे. 

'या' स्थानकांवर यंत्रणा लागू...

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ, प्रभादेवी, माहीम, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवलीसह एकूण 22 स्थानकांवर ही नवी यंत्रणा लागू करण्यात आली आहे. तसेच, मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, वाशी, पनवेल, उरण, नेरळ, जुईनगर, मानखुर्द, चुनाभट्टी, शिवडी, डॉकयार्ड रोड, रे रोड, टिटवाळा, लोणावळासह 32 स्थानकांवर ही आधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली म्हणजे काय? 

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही प्रणाली मायक्रोप्रोसेसरवर आधारित असून यामध्ये जुन्या रिले सिस्टीमऐवजी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक मॉड्युलद्वारे ट्रॅक सिग्नल्स, पॉइंट मशीन यांसारखी उपकरणे अचूक आणि सुरक्षितपणे नियंत्रित केली जातात. 

हे ही वाचा: पवित्र रिश्ता फेम मराठीमोळी अभिनेत्री 'प्रिया मराठे'चं निधन

पूर्वी ट्रॅक बदलण्यासाठी कर्मचारी लोखंडी लिव्हरचा वापर करायचे. नंतर हे काम इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बटणांच्या मदतीने होण्यास सुरूवात झाली. 2012 मध्ये सिग्नलिंग सिस्टीम आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी सुद्धा सिस्टीम सुरू केली होती. आता पूर्णपणे संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या माध्यमातून कंप्यूटरवरूनच गाड्यांचे मार्ग नियोजन आणि नियंत्रित केले जातात. 

हे ही वाचा: ऑनर किलिंगनं पुणे हादरलं! लग्नाची बोलणी करायला घरी बोलावलं, नंतर खोलीत नेलं आणि...

अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? 

या प्रणालीद्वारे पॉइंट फेल्युअर, सिग्नलिंग यंत्रणेतील बिघाड, उपकरणांची दुरुस्ती अशा घटना कमी होतात. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी सिस्टीम महत्त्वपूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या मते, संगणकीकृत प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन चुका टळतात. कार्यक्षमता वाढते तसेच रेल्वे वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि वेगवान होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp