बुध ग्रहाचा केतू नक्षत्रात प्रवेश, काही राशीतील लोकांना पैशाची कमी पडणार नाही, काय सांगतं राशीभविष्य?
Astrology : बुध ग्रहाने 30 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश केला. त्यानंतर हाच बुध ग्रह केतू मघ राशीत प्रवेश करेल. या प्रवेशाने महत्वाची नक्षत्रीय घटना आहे, ज्याचा सर्व राशींप्रमाणे इतर काही राशींवरही चांगला परिणाम निर्माण होऊ शकतो.

1/5
बुध ग्रहाने 30 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश केला. त्यानंतर हाच बुध ग्रह केतू मघ राशीत प्रवेश करेल. या प्रवेशाने महत्वाची नक्षत्रीय घटना आहे, ज्याचा सर्व राशींप्रमाणे इतर काही राशींवरही चांगला परिणाम निर्माण होऊ शकतो.

2/5
बुध ग्रहाने 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:48 वाजता मघ नक्षत्रात प्रवेश केला. याचा आध्यात्मिक आणि बौद्धिक पैलूंवर खोलवर परिणाम होईल. बुध आणि मघ नक्षत्राचा हा संयोग असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं

3/5
सिंह राशी :
सिंह राशीतील हे संक्रमण अनेक क्षेत्रात शुभ परिणाम देतील. तुमची बौद्धिक क्षमता वाढून नवीन गोष्टी शिकण्यास मिळतील. आपली बोली सुधारेल ज्याचा वापर करिअरसाठी निश्चित होईल. समाजात आदर वाढून आर्थिक स्थिती चांगली होईल.

4/5
वृषभ राशी :
वृषभ राशीच्या लोकांसाठी, मघ नक्षत्रात बुध ग्रहाचे भ्रमण अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आपले विचार मनमोकळेपणाने मांडू शकता. यामुळे धैर्य आणि आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्याला भावनिकदृष्ट्या हलके वाटू शकते.

5/5
वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीच्या लोकांना बुध राशीच्या या संक्रमणाचा खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या दीर्घकालीन समस्या लवकरच संपतील. करिअरच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि भविष्यात नवीन योजना बनतील.