'राज ठकरे कुचक्या कानाचा, फडणवीसांनी याच्या पोराला पाडलं तरीही... मनोज जरांगेंनी राज ठाकरेंनाही सोडलं नाही

Manoj Jarange Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आरक्षणाबाबत स्पष्टीकरण द्यावं असं ते म्हणाले होते. आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना कुचक्या कानाचा म्हणत टीका केली आहे. 

manoj Jarange patil
manoj Jarange patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

31 ऑगस्ट उपोषणाचा तिसरा दिवस

point

मनोज जरांगेंनी राज ठाकरेंनाही सोडलं नाही

point

नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रविवारी 31 ऑगस्ट रोजी तिसऱ्या दिवशी उपोषण करत आहेत. असंख्य मराठा बांधवही या आंदोलनात सामिल झाल्याचं बघायला मिळत आहे. याच आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आरक्षणाबाबत स्पष्टीकरण द्यावं असं ते म्हणाले होते. आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना कुचक्या कानाचा म्हणत टीका केली आहे. 

हे ही वाचा : मराठा आंदोलक आक्रमक! खासदार सुप्रिया सुळेंची गाडी अडवली अन् घेराव घातला, नंतर घडलं असं काही..

मनोज जरांगे काय म्हणाले? 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील समाजाचं म्हणणं आहे की, ते दोघेही भाऊ चांगले आहेत. ब्रँडही चांगला आहे, पण या लोकांना विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांत पडायचं. आम्ही कधी विचारले का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते तिथून पळून गेले? त्यानंतर आमच्या मराठवाड्यात कधी आला होता? असा देखील त्यांनी प्रश्न केला.

त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही कधीही तुम्हाला विचारलं का की, तुम्ही पुण्यात कधी गेला? तुमची नाशिकची सासरवाडी आहे तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारलं का? एका लोकसभा निवडणुकीलाच फडणवीसांनी तुझा गेम केला होता. त्यानंतर त्यांनीच तुझ्या पोराला विधानसभा निवडणुकीत पाडलं होतं, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंनाही सोडलं नाही.

हे ही वाचा : नवरा गाढ झोपला होता, बायकोनं पाहिलं अन्... भयंकर कांड केलं

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की, मराठा मोर्चा आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं हे एकनाथ शिंदेच देतील. मनोज जरांगे हे पुन्हा का आले याचंही उत्तर तेच देतील. एकनाथ शिंदे मागच्या वेळीस नवी मुंबईत गेले होते. त्यावेळी त्यांनीच हा प्रश्न सोडावला होता ना, मग आता हे परत का आलेत? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला होता. त्याच नंतर आता मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp