देशात आता निवडणुका झाल्या, तर कोणाचं सरकार येणार? BJP की Congress? खळबळ उडवून टाकणारा MOTN सर्व्हे वाचा एकदा
MOTN Survey 2025 : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं कामकाज करत आहेत, याबाबत नेहमीच चर्चा होत असते. काही लोक म्हणतात की, मोदी खूपच चांगलं काम करत आहेत. तर काही जण म्हणतात विरोधी पक्षाला सरकारमध्ये येण्याची संधी मिळाली पाहिजे.

बातम्या हायलाइट

INDIA आणि NDA ला किती जागा मिळतील?

भाजप-काँग्रेसला किती मतदान मिळणार?

MOTN सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर
MOTN Survey 2025 : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं कामकाज करत आहेत, याबाबत नेहमीच चर्चा होत असते. काही लोक म्हणतात की, मोदी खूपच चांगलं काम करत आहेत. तर काही जण म्हणतात विरोधी पक्षाला सरकारमध्ये येण्याची संधी मिळाली पाहिजे. तसच राहुल गांधी प्रधानमंत्री झाले पाहिजेत, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. अशातच आताच्या घडीला देशात निवडणुका झाल्या, तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? याबाबत इंडिया टुडे आणि सी-व्होटरने मूड ऑफ द नेशन ( MOTN) सर्व्हे केला केला आहे.
INDIA आणि NDA ला किती जागा मिळतील?
MOTN सर्व्हेनुसार, देशात जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर NDA ला 324 जागा मिळू शकतात. तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीला 208 जागा मिळू शकतात. इतर पक्षांना 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
भाजपच्या जागा 240 ने वाढून 260 पर्यंत पोहचू शकतात. परंतु, भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. म्हणजेच भाजप 272 जागांच्या मागेच राहील. तर काँग्रेसच्या दोन जागा कमी होतील. म्हणजेच काँग्रेस 99 जागांवरून 97 जागांवर पोहोचू शकते. याशिवाय इतर खात्यात 186 जागा जाण्याची शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा >> 'आता पाटील म्हणतील तसं..', अखेर मनोज जरांगे आझाद मैदानावर धडकले, मराठा आंदोलकांचा मुंबईत एल्गार
भाजप-काँग्रेसला किती मतदान मिळणार?
जर व्होट शेअरबाबत बोलायचं झालं, तर NDA ला सर्वाधिक 46.7 %, INDIA आघाडीला 40.9 % आणि इतर पक्षांना 12.4 % मतं मिळण्याचा अंदाज आहे. जर पक्षनिहाय बोलायचं झालं तर, भाजपला 40.6%,काँग्रेसला 20.8 % आणि इतर पक्षांना 38 .6 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA ला 293 आणि INDIA आघाडीला 234 जागा मिळू शकतात. तर फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या MOTN सर्व्हेमध्ये NDA ला 343 आणि इंडिया आघाडीला 188 जागा मिळू शकतात.
व्होट शेअरबाबत बोलायचं झालं, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA ला 43% ,आणि इंडिया आघाडीला 40 टक्के मतं मिळाली होती. फेब्रुवारी 2025 च्या MOTN सर्व्हेमध्ये NDA ला 47% ,आणि इंडिया आघाडीला 41 % मतं मिळण्याचा अंदाज लावण्यात आला होता. 2024 मध्ये भाजपला 240 आणि काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या. फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये BJP ला 281 आणि काँग्रेसला 78 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
हे ही वाचा >> PM मोदींनंतर पंतप्रधानपदाचा दावेदार कोण? 28 % लोकांचा अमित शाहांना सपोर्ट, योगी आणि गडकरींचं काय? MOTN सर्व्हे वाचा
देशातील सर्व राज्यांमध्ये आणि लोकसभा विभागात 1जुलै ते 14 ऑगस्ट 2025 दरम्यान 54 हजार 788 लोकांचं मत जाणलं आहे. याशिवाय मागील 24 आठवड्यांमध्ये 1 लाख 52 हजार 38 लोकांनी जे मतं व्यक्त केलं आहे, तेही या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याप्रकारे एकूण 2 लाख 6 हजार 826 लोकांचं मतप्रदर्शन या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आलं आहे.