'...आम्ही परत जाणार नाही', मराठा समाजाचा 'चलो मुंबई' मोर्चा आझाद मैदानावर धडकणार, जरांगेंनी CM फडणवीसांना दिला इशारा

मुंबई तक

Manoj Jarange Chalo Mumbai Morcha : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल रविवारी 24 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली.

ADVERTISEMENT

Manoj Jarange Latest News Update
Manoj Jarange Latest News Update
google news

बातम्या हायलाइट

point

जरांगेंनी CM देवेंद्र फडणवीसांवर केले आरोप

point

महादेव मुंडेंच्या हत्याप्रकरणाबाबत केलं मोठं वक्तव्य

point

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Chalo Mumbai Morcha : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल रविवारी 24 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा केली. बीड जिल्ह्यातील मंजरसुम्बा येथे आयोजीत सभेत जरांगे यांनी जनतेला संबोधीत केलं. जरांगे यांनी राज्यभरातील मराठा समाजाच्या लोकांना 27 ऑगस्ट रोजी 'चलो मुंबई' मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं आहे. ही समाजाची शेवटची लढाई असेल, असं जरांगे म्हणाले. 

जनतेला संबोधीत करताना जरांगे म्हणाले, या वेळी जमा होणाऱ्या गर्दीनं सरकारला धक्का दिला पाहिजे. जर इथे याचा दणका बसला नाही, तर मुंबईत पोहोचल्यावर सरकारला खरा दबाव काय असतो, हे माहित होईल. आता लढाई मुंबईच्या रस्त्यावर लढली जाईल. 

जरांगे यांनी घोषणा केली की, 29 ऑगस्टपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आझाद मैदानावर शांतीपूर्ण धरणे आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन मराठा समाजासाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात ओबीसी श्रेणीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर असणार आहे. 

जरांगे म्हणाले, ही आरक्षणाविरोधात शेवटची लढाई आहे. आरक्षणाशिवाय आम्ही परत जाणार नाही. जरांगे यांनी लोकांना शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा आग्रह केला. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन द्यायचं नाही, असंही ते म्हणाले. कोणी दगड फेकला तर, त्याला लगेच पोलिसांच्या ताब्यात द्या. हा सरकारचा प्लॅनही असू शकतो. आंदोलन पूर्णपणे शांतीपूर्ण झालं पाहिजे. 

हे वाचलं का?