Amit Shah Interview : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Amit Shah Interview : देशाची माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यावर अमित शाहांनी भाष्य केलं आहे.

बातम्या हायलाइट

Amit Shah Interview

धनखड यांच्या राजीनाम्यावर भाष्य काय म्हणाले शाह?
Amit Shah : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ANI ने घेतलेल्या मुलाखतीत संससेद पारीत करण्यात आलेल्या कायद्याला विरोधकांनी निषेध व्यक्त केला होता. त्यावर भाष्य केलं आहे. 25 ऑगस्ट रोजी सोमवारी ते 130 व्या घटनादुरुस्तीच्या विधेयकावर भाष्य केले. तसेच त्यांनी पुढे देशाची माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे.
ANI शी बोलताना अमित शाह काय म्हणाले?
ते म्हणाले की, जे लोक आजही विधेयकाचा विरोध करत आहेत ते तुरुंगात जातील. त्याच तुरुंगात सरकारही स्थापन करतील. ते तुरुंगाचे रुपांतर मुख्यमंत्री निवासस्थान, पंतप्रधान निवास्थानात करू शकतात, असे अमित शाह म्हणाले आहेत. त्यानंतर अमित शाहांनी राहुल गांधींना काही प्रश्नही केलेत.
ते म्हणाले की, लालू यादव यांना वाचवण्यासाठी मनमोहनसिंह यांनी एक अध्यादेश आणला होता. तोच अध्यादेश राहुल गांधींना का फोडला? असा प्रश्न अमित शाहांनी केला आहे. जर त्यांच्याकडे एवढीच नैतिकता नव्हती. तुम्ही सलग तीन वेळा निवडणुकीत पराभव झालात, असे अमित शाह म्हणाले. त्यानंतर देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरही अमित शाहांनी भाष्य केले.
हे ही वाचा : पाऊस आला म्हणून महिला शिरली दुकानात, थेट करोडपती बनूनच पडली बाहेर!
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं भाष्य
अमित शाह म्हणाले की, धनखडजी हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगलं काम केलं. त्यांनी आपल्या आपल्या वैयक्तिक आजारपणामुळेच राजीनामा दिला असल्याचं अमित शाह म्हणाले. त्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, त्यांनी सलवा कुलूम नाकारला आणि आदिवासींचा स्वरंक्षणाचा अधिकारही रद्द केला. म्हणूनच या देशात नक्षलवाद दोन दशकांहून अधिककाळ सुरूच आहे. माझा असा विश्वास आहे की डाव्या विचारसरणींचा म्हणजेच विरोधकांचा सुदर्शन रेड्डींना निवडण्याचा निकष असू शकतो, असे ते म्हणाले.