बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल.. साधा भोपळाही फोडला नाही, महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका

मुंबई तक

Best Election Result : बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलेला आहे. ठाकरेंना साधा भोपळाही फोडता न आल्याने आगामी महापालिका निवडणुकीवर ठाकरे बंधूंच्या विजयावर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

Best Election Result
Best Election Result
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Best Election चा निकाल जाहीर

point

एवढ्या मतांनी एकहाती सत्ता

point

ठाकरेंचा सुपडासाफ

Best Election Result : मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक लढवली. ही निवडणूक 18 ऑगस्ट रोजी सोमवारी पार पडली असता, या निवडणुकीत एकूण 83 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. ही निवडणूक ठाकरे बंधुंसाठी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाची ठरणार आहे. याचा महापालिकेच्या निवडणुकीवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे बोललं जात होतं. याच निवडणुकीत ठाकरे बंधूंचा डंका वाजेल अशी अनेकांना अशा होती, पण ही आशा धूसर झाली आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधूंच्या पॅनलला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंसाठी जरा जास्त कठीण असेल.  

हे ही वाचा : मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस 

ठाकरेंचा महायुतीवर सुफडासाफ 

या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी उत्कर्ष हे संयुक्त पॅनेल रिंगणात उतरवले होते. तर त्यांच्या विरोधात आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभेसह, मंत्री नितेश राणे यांच्या समर्थ बेस्ट पॅनेल संघटनेनंही आपलं पॅनेल उभं केलं होतं. प्रचारादरम्यान, ही निवडणूक ठाकरे बंधु आणि प्रसाद लाड यांच्यातच रंगल्याचं दिसून आलं. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकाही जागेवर निवडणूक जिंकता आली नसल्याचं चित्र आता समोर आलं आहे.

दुसरीकडे बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 14 जागा निवडून आल्या आहेत. तर भाजपप्रणित पॅनलच्या 7 जागा निवडून आल्या आहेत. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आलेला नाही. 

  • शशांक राव पॅनल - १४
  • प्रसाद लाड पॅनल - ०७
  • मनसे - शिवसेना - ००

नऊ वर्षानंतर निवडणूक 

ही बेस्ट कामगारांच्या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडली. याच पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जल्लोष केला होता. हा निकाल 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पासून सायंकाळी 5 वाजेच्यादरम्यान जाहीर करण्यात येणार असं सांगितलं होतं. परंतु, पावसामुळे मतमोजणीत काही प्रमाणात तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यानं निकालाला काही तास विलंब झाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp