"पोलिसांचा वापर करत फडणवीस मराठ्यांना त्रास देतात, एवढंच वाटतं तर महादेव मुंडे.." जरांगेंची तोफ धडाडली, मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही

Manoj Jarange Patil : 24 ऑगस्ट रोजी रविवारी बीड जिल्ह्यातील मंजरसुबा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेला संबोधित करताना त्यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे जाण्यासाठी मराठा बांधवांना आंदोलनात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे. ही अंतिम लढाई असेल असं देखील ते म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा तापला

point

मनोज जरांगे मुंबईकडे कुच करणार

point

देवेंद्र फडणवीसांनाही जरांगेंनी सोडलं नाही

Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा तापलेला दिसून येत आहे. मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईकडे कुच करणार आहेत. 24 ऑगस्ट रोजी रविवारी बीड जिल्ह्यातील मंजरसुबा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेला संबोधित करताना त्यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे जाण्यासाठी मराठा बांधवांना आंदोलनात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे. ही अंतिम लढाई असेल असं देखील ते म्हणालेत.

हे ही वाचा : तब्बल 30 वर्षानंतर शनि ग्रहानं बदलला मार्ग, आता तुमचं नशीब चमकणार, काय सांगतं तुमचं राशीभविष्य?

जरांगेंची तोफ धडाडली

जनतेला संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, यावेळी गर्दी सरकारला हलवून ठेवेल. जर याचा कसलाही परिणाम जर सरकारवर झाला नाही,तर मुंबईत जावून सरकारला खरी परिस्थितीची जाणीव करून देऊ. आता लढाई ही मुंबईच्या रस्त्यांवर होईल, असे मनोज जरांगे म्हणाले.

त्यानंतर त्यांनी मोठी घोषणा करत सांगितलं की, 29 ऑगस्ट रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आझाद मैदानावर शांततापूर्ण धरणे आंदोलन करतील. त्यांचं हे आंदोलन मराठा समजासाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाबाबत संबंधित आहे. यासाठी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवंय, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच त्यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही धारेवर धरलं आहे.

हे ही वाचा : “दीदी मला सुद्धा...” बहिणीने धरला ‘तो’ हट्ट! दिदीची जागेवरच सटकली अन् रस्त्यातच...

फडणवीसांना जरांगेंनी धरलं धारेवर

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धारेवर धरलं आहे. देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलनादरम्यान, अडचणी निर्माण करत आहेत. फडणवीस हे पोलिसांचा वापर करत मराठा समाजाला त्रास देत आहेत, असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाही सोडलं नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की, मराठा समाजाला त्रास देण्याऐवजी त्यांनी महादेव मुंडेंच्या हल्लेखोरांना पकडलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी चांगलंच सुनावलं.

संबंधित प्रश्न : 

मनोज जरांगे कोण? 

मराठा समाजाचे आंदोलक म्हणून मनोज जरांगेंची ओळख आहे. 

बीड जिल्ह्यात कुठे सभा झाली?

बीड जिल्ह्यातील मंजरसुबा येथे आयोजित करण्यात आली होती. 

मनोज जरांगे मुंबईत कधी कुच करणार? 

27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कुच करणार आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp