ठाकरे ब्रँड एकत्र येऊनही ‘BEST’ दणका, BMC निवडणुकीवर काय परिणाम?
ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना बेस्ट पतपेढी निवडणूक जिंकता आली नाही. या निवडणुकीमुळे BMC निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले उद्धव व राज ठाकरे भावांनी एकत्र येत लढवलेल्या पहिल्या निवडणुकीत सुपडा साफ झालाय. आणि या निवडणुकीवरुन भाजपचा आंनंद पोटात माईना अशी परिस्थिती आहे. अर्थात ही निवडणूक छोटी असली तरी महत्त्वाची होती. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने जबरदस्त विजय मिळवला. त्यांच्या 14 जागा निवडून आल्या.
ठाकरे बंधूंचा मोठा पराभव
21 जागांसाठीची ही निवडणूक बेस्ट कामगारांची होती. या निवडणुकीत बॅलेट पेपर म्हणजे मत पत्रिकेद्वारे मतांची नोंदणी करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपा, प्रसाद लाड महायुतीला 6 जागा मिळाल्या यापैकी 4 भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळाल्यात आणि एक जागा एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन च्या युनियनने जिंकली आहे. आता या निवडणुकीत सपाटून पराभव मिळाल्यानंतर ठाकरे बंधूंच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ लागले आहेत.
‘बेस्ट’ पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या दोन्ही पक्षांच्या युतीच्या पॅनेलचा धुव्वा उडाल्याने ठाकरे बंधू एकत्र आल्याची सुरुवात काही चांगली झालेली नाही. या पराभवानंतर आगामी मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढविणार का, याबाबत अद्याप स्पष्टता काही नाही. बीएमसीसाठीही भावांमध्ये युतीचं अजून काहीही ठरलेलं नाही. पण भाजपकडून मात्र हा विजय महापालिका विजयाची जणू काही पायाभरणी आहे अशा पद्धतीने सेलिब्रेट केला जात आहे. हा विजय भाजपसाठी शुभसंकेत मानला जातोय.
खरोखर या पराभवाने दोन्ही ठाकरे भावांच्या युतीवर परिणाम होणार का? आणि आगामी मनपा निवडणुकीवर खासकरुन बीएमसीमध्ये याचा प्रभाव जाणवणार आहे का? याचबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.