“दीदी मला सुद्धा...” बहिणीने धरला ‘तो’ हट्ट! दिदीची जागेवरच सटकली अन् रस्त्यातच...
मध्य प्रदेशातील सतना येथे एका 15 वर्षींय मुलीने आपल्या लहान बहिणीची गळा दाबून हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. लहान बहिणीने केलेल्या किरकोळ हट्टामुळे आरोपी मुलीनं तिची हत्या केल्याची माहिती आहे.

बातम्या हायलाइट

लहान बहिणीने हट्ट केला अन् मोठी बहीण संतापली..

रागाच्या भरात केला बहिणीचा खून
Crime News: मध्य प्रदेशातील सतना येथे एका 15 वर्षीय मुलीने असा गुन्हा केला, ज्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मुलगी बाजारात जात असताना तिच्या धाकट्या बहिणीने तिच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. ती म्हणाली, "दीदी, मला पण तुझ्यासोबत यायचं आहे." पण मोठ्या बहिणीने तिला सोबत नेण्यास नकार दिला. तरीसुद्धा, ,मुलीची धाकटी बहीण तिच्या मागे जाऊ लागली. मात्र, त्यावेळी तिची मोठी बहीण प्रचंड संतापली आणि रागाच्या भरात तिने वाटेतच तिच्या धाकट्या बहिणीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलीने घाबरून धाकट्या बहिणीचा मृतदेह झुडपात फेकून दिला आणि मग ती घरी परतली.
घरी पोहोचल्यानंतर तिने आरोपी मुलीने तिच्या आई-वडिलांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. मात्र, तपासात मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं. खरंतर,, हत्येची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सोमवारी कोळगवान पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
गळा दाबून संपवलं अन् मृतदेह झुडपात...
हे प्रकरण कृपालपूर परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. 15 वर्षीय आरोपी मुलीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल करत सांगितलं की ती 16 ऑगस्ट रोजी सकाळी बाजारात जात असताना तिची धाकटी बहीण तिच्यासोबत जाण्याचा हट्ट धरू लागली. वारंवार नकार देऊन आणि मारहाण करूनही ती बाजारात जाण्यासाठी तिच्या मागे लागली होती. त्यानंतर मोठी बहीण प्रचंड रागावली आणि तिने रस्त्यातच तिच्या धाकट्या बहिणीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिने बहिणाचा मृतदेह झुडपात फेकून दिला.
हे ही वाचा: आली लहर केला कहर... भर पुराच्या पाण्यात टेबल टाकून मद्यपान करणाऱ्या काकांची जोडी! Video प्रचंड व्हायरल
मृतदेह घरी आणला अन् वेगळीच कहाणी...
सुमारे तीन तासांनंतर आरोपी मुलगी बाजारातून परत घरी जात असताना तिने तिच्या बहिणीचा मृतदेह झुडपांमधून उचलला आणि घरी आणला. त्यावेळी तिने कुटुंबातील सदस्यांना सांगितले की तिला रस्त्यावर तिच्या बहिणीची चप्पल सापडली आणि तिचा शोध घेतला तेव्हा ती झुडपात बेशुद्ध अवस्थेत आढळली. कुटुंबियांनी पीडितेला ताबडतोब रुग्णालयात नेलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हे ही वाचा: सासूला Ex-Air Hostess सुनेचा वैताग आला होता..सुनेनं कुटाकुटी केल्यावर सासू थेट गेली कोर्टात अन् नंतर घडलं..
पोलिसांसमोर केला गुन्हा कबूल
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळाजवळील पेट्रोल पंपाचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. सोमवारी पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आल्यानंतर, पोलिसांनी आरोपी मुलीची तिच्या कुटुंबियांसमोर चौकशी केली. त्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी मुलीनं सांगितलं की तिच्या धाकट्या बहिणीच्या हट्टीपणाच्या सवयीमुळे ती वैतागली होती, म्हणूनच तिने हे भयानक पाऊल उचललं. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला बाल न्यायालयात हजर केलं असून तिथून तिला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.