बहिणीच्या बर्थडेला चाकूने कापला केक..त्याच चाकूने केला खतरनाक मर्डर! सर्वांना हादरंवून टाकणारी घटना, घडलं तरी काय?

Shocking Murder Case Viral News :  मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यातील नानाखेडी मंडी परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 8 पैकी 7 आरोपींना अटक केली आहे.

वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक. (छायाचित्र: प्रातिनिधिक)
Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शहरात गँगची दहशत आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण

point

पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

point

त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना

Shocking Murder Case Viral News :  मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यातील नानाखेडी मंडी परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 8 पैकी 7 आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे. अभिषेक आणि त्याच्या साथीदारांनी मीशो शॉपिंग अॅपच्या माध्यमातून धारदार चाकू खरेदी केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्याच चाकूने अभिषेकच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त केक कापला आणि त्यानंतर त्याच चाकूने अनिल करोसियाची हत्या केली. 

या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी ललितने संपूर्ण घटनेचा खुलासा केला आणि त्याच्या साथीदारांची नावं सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सहा तासांच्या आत 6 आरोपींना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत अनिल करोसिया आणि मुख्य आरोपी अभिषेक उर्फ टिंगा यांच्या जुना वाद सुरु होता. 

शहरात गँगची दहशत आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण

करोसियाने आरोपीच्या बहिणीविरोधात चुकीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संतापलेल्या अभिषेकने त्याच्या साथीदारांसोबत मिळून करोसियाच्या हत्येचा कट रचला. शहरात गँगची दहशत करणे आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवणे असा त्यांचा उद्देश होता. 21 ऑगस्टच्या रात्री पोलिसांना नानाखेडी मंडी परिसरात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. अनिल करोसिया असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मृताच्या चुलत भावाने अभिषेक आणि त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त केला. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन मुलं पळून गेल्याचं समोर आलं. यापैकी एक आरोपी ललित चेडंलला पोलिसांनी पकडलं. 

हे ही वाचा >> गणेशभक्तांनो! लालबागच्या राजाचं मुखदर्शन सोहळा संपन्न..सोनेरी मखरमध्ये विराजमान झाले बाप्पा, पाहा जबरदस्त Video

त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना

नवी दिल्लीच्या सीलमपूर परिसरात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली होती. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी स्वत: दोन लहान मुलांना सोबत घेऊन सीलमपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आणि हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp