स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोनंही दिलं..हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी सुनेला जाळलं! सख्ख्या बहिणीनं..
Today Shocking Viral News : सासरच्या लोकांनी सुनेकडे हुंड्याची मागणी केल्यामुळे सर्वात भयंकर घटना घडली. निक्की आणि तिची बहीण कांचनने 10 डिसेंबर 2016 रोजी विपिन आणि रोहित नावाच्या तरुणांसोबत लग्न केलं होतं.

बातम्या हायलाइट

भाटी कुटुंबियांनी हुंड्याची मागणी केली आणि..

रोज रात्री दोघी बहिणी रडायच्या अन्..

त्या गावात नेमकं काय घडलं?
Today Shocking Viral News : सासरच्या लोकांनी सुनेकडे हुंड्याची मागणी केल्यामुळे सर्वात भयंकर घटना घडली. निक्की आणि तिची बहीण कांचनने 10 डिसेंबर 2016 रोजी विपिन आणि रोहित नावाच्या तरुणांसोबत लग्न केलं होतं. दोन्ही भावांसोबत तरुणींनी लग्नगाठ बांधली होती. टॉप मॉडेल स्कॉर्पिओ, बुलेट बाईक, रोख रक्कम आणि सोनं हुंडा म्हणून सासरच्या लोकांना दिलं होतं. पण तरीही सासरची माणसं खुश नव्हती. एवढा हुंडा दिल्यानंतरही निक्कीच्या वडिलांना त्यांची मुलगी गमवावी लागली. कारण सासरच्या लोकांनी निक्कीला जाळून मारलं.
भाटी कुटुंबियांनी हुंड्याची मागणी केली आणि..
आरोपी भाटी कुटुंबाने निक्कीवर माहेरून 36 लाख रुपये हुंडा आणण्यासाठी दबाव टाकला होता. निक्कीच्या कुटुंबियांना इतक्या पैशांची सोय करता आली नाही. त्यानंतर निक्कीचा पती आणि सासू दयाने तिला बेदम मारहाण केली आणि आग लावून तिला पेटवून दिलं.
रोज रात्री दोघी बहिणी रडायच्या अन्..
कांचनने म्हटलं की, विपिन आणि रोहित नेहमी उशिरा रात्री घरी यायचे. ते आमचा फोनही उचलत नव्हते. जेव्हा आम्ही त्यांना काही विचारायचो, तेव्हा ते आमच्यावर ओरडायचे. ते दुसऱ्या महिलेसोबत वेळ शेअर करायचे. जेव्हा आम्ही त्यांना याबाबत विचारायचो, तेव्हा ते आम्हाला मारहाण करायचे. दररोज रात्री आम्ही रडायचो. माझी बहीण माझ्यापेक्षा दोन-तीन वर्ष लहान होती. पण लोक आम्हाला जुळ्या बहिणी समजायचे.
हे ही वाचा >> मनसेला मतं पडतात जर सगळंच काढलं तर 10-12 वर्षांचा खेळ... मतांच्या चोरीवरून राज ठाकरेंचं रोखठोक विधान
कांचनच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी विपिनला अटक केली आहे. त्याचे आई-वडील आणि भाऊ फरार आहे. निक्की आणि विपिनला सहा वर्षांचा एक मुलगा आहे. निक्कीच्या मुलाने घटनेबाबत माहिती दिली की, आरोपींनी आईवर काहीतरी टाकलं. त्यानंतर त्यांनी तिला थप्पड मारली आणि लायटरने आग लावली. दरम्यान, निक्कीच्या वडिलांनी मागणी केली आहे की, आरोपींना लोकांसमोर मारलं पाहिजे आणि त्यांचं घरही उद्ध्वस्त केलं पाहिजे. निक्कीच्या आईने म्हटलं की, संपूर्ण कुटुंबा या हत्याप्रकरणात सामील होतं. त्यांनी माझ्या मुलीला मारलं. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलीचा खूप छळ करण्यात आला.