भयंकर! आईनं 3 वर्षाच्या चिमुरडीसह स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

Dowry Crime News : आईनेच आपल्या मुलीला पेटवलं आणि त्यानंतर तिने स्वत:लाही पेटवलं आणि आत्महत्या केली. या प्रकरणाचे कारण आता समोर आलं आहे.

Dowry crime
Dowry crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईनं मुलीसह स्वत:ला घेतलं पेटवून

point

हादरवून टाकणारं कारण आलं समोर

point

नेमकं काय घडलं?

Dowry Crime News : राजस्थानच्या जोधपूरमध्ये मन हेलावून टाकणार धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आईनेच आपल्या मुलीला पेटवलं आणि त्यानंतर तिने स्वत:लाही पेटवून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी निष्पाप मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर शनिवारी सकाळी एमजीएचच्या बर्न युनिटमध्ये उपचारादरम्यान आईचाही मृत्यू झाला. आत्महत्या केलेल्या आईचं नाव संजू बिश्नोई असे आहे तर, निष्पाप मुलीचं नाव यशस्वी असे आहे.

हे ही वाचा : मनसेला मतं पडतात जर सगळंच काढलं तर 10-12 वर्षांचा खेळ... मतांच्या चोरीवरून राज ठाकरेंचं रोखठोक विधान

मुलीसह स्वत:लाही पेटवून घेतलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी संजू बिश्नोई ही शाळेतून घरी परतली. त्यानंतर तिने पेट्रोल घेतलं आणि स्वत:वर आणि आपल्या मुलीवर ओतून पेटवून घेतलं. काही क्षणार्धातच दोघीही माया लेकी आगीत होरपळून निघाल्या आणि नंतर जळून खाक झाल्या. तेव्हा गावकऱ्यांना घरातून धूर येत असल्याचं दिसलं. हे चित्र पाहून एकच खळबळ उडाली.

संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच सदस्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा एकच गोंधळ उडाला. संबंधित परिस्थितीत गंभीर दिसून येत होती. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान, संजूचाही मृत्यू झाला होता. यानंतर मृतदेहावरून दोन्ही परिवारात वाद उफळला. अखेर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी माहेरच्या सदस्यांकडे सोपवण्यात आले. त्यांनी माहेरच्या सदस्यांनी आई-मूलीवर अंत्यसंस्कार केले.

हे ही वाचा : मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड

हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त

संबंधित प्रकरणात एफएसएल पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केलेत. ही घटना हुंड्याच्या छळाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. संजूचा पती दिलीप बिश्नोई, तसेच तिच्या सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं समाज हादरून गेला आहे. आई आणि तिच्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाच्या अशा अकाली मृत्यूने हुंडा व्यवस्थेचे कटू सत्य पुन्हा एकदा समोर आणले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp