अनैतिक संबंधामध्ये प्रचंड गुंतली अन् पत्नीने 60 वर्षाच्या पतीसोबत केलं भयंकर कृत्य!
राजस्थानच्या भरतपुरमध्ये एक महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रियकरासोबत मिळून पत्नीने रचला पतीच्या हत्येच्या कट

हत्येनंतर मृतदेह कोरड्या विहिरीत...
Murder Case: राजस्थानच्या भरतपुरमध्ये नवरा बायकोच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एक महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, मृताचं वय 60 वर्षे असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान, बयाना पोलीस स्टेशन परिसरातील भिडवली गावाजवळील कोरड्या विहिरीत पोलिसांना मृताचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव देवी सहाय असून तो करौली जिल्ह्यातील बालाघाट पोलीस स्टेशन परिसरातील मुडिया गावाचा रहिवासी होता. 20 ऑगस्टच्या रात्री तो घरातून अचानक बेपत्ता झाला. त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र, कोणताच पुरावा सापडला नाही. तपासादरम्यान, पोलिसांना मृताची पत्नी कुसुमवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी कुसुमला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली.
हे ही वाचा: पती घरी नसताना मध्यरात्री वहिनीच्या खोलीत अज्ञात पुरुष... दीराने पाहिलं म्हणून दुसऱ्या मजल्यावरून उडी अन्...
पत्नीने पोलिसांकडे सगळं कबूल केलं
कठोर चौकशी केल्यानंतर कुसुमचे करौली गावातच राहणाऱ्या पिंटु गुर्जर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं तिने कबूल केलं. पती तिच्या प्रेमसंबंधामध्ये अडसर ठरत असल्याचं देखील तिने सांगितलं. त्यामुळे कुसुम आणि तिच्या प्रियकराने सहायला मारून टाकण्याचा कट रचला आणि त्याची हत्या केली. कोणालाच हत्येबद्दल कळू नये, यासाठी त्यांनी पतीचा मृतदेह भिडवली गावाजवळील एका कोरड्या विहिरीत फेकून दिला.
हे ही वाचा: पुण्यातील भररस्त्यात शाळेच्या आवारात तरुणींच्यात तुफान राडा, बॉयफ्रेंडला मेसेज केल्यानं लाथा बुक्क्यांनी मारहाण अन् वाद पेटला
आरोपी पत्नी आणि प्रियकर ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, आरोपी पत्नी कुसुम आणि तिचा प्रियकर पिंटू यांना ताब्यात घेतलं असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोक वैवाहिक नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेची चर्चा करत असल्याचं पाहायला मिळतंय.