आख्खा गाव हादरला! नराधम पतीने गर्भवती महिलेचे तुकडे तुकडे केले अन् नदीत फेकले..नेमकं घडलं तरी काय?

Crime News : एका पतीने आपल्याच गर्भवती पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचे तुकडे एका पिशवीत भरले आणि वाहत्या नदीत फेकून दिले.

प्रतीकात्मक प्रतिमा
Today Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीनेकडून गर्भवती पत्नीची हत्या

point

बॅगेत भरून ठेवले मृतदेहाचे तुकडे

point

नेमकं काय घडलं?

Crime News : पतीने आपल्याच गर्भवती पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचे तुकडे एका पिशवीत भरले आणि वाहत्या नदीत फेकून दिले. हत्या करण्यात आलेल्या पत्नीचं नाव स्वाती उर्फ ज्योती असे आहे. तर आरोपी पतीचं नाव महेंद्र रेड्डी असे आहे. ही घटना तेलंगनातील हैदराबाद येथील मेडचल जिल्ह्यातील मेडिपल्ली पोलीस ठाणे परिसरातील आहे. या घटनेनं मेडचल जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड

पत्नी स्वाती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी यांच्यात नेहमी वाद व्हायचा. दोघांनीही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह केला होता. दोघेही मेडिपल्लीतील बोडुप्पलस्थितच असून भाडेतत्वावर राहत होते. महेंद्र हा कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह व्हायचं.

दोघांच्यात कौटुंबिक कलह अन्..

दोघांच्यात कौटुंबिक कलह झाला आणि गर्भवती पत्नीची हत्या करण्यात आली. घटनास्थळी असलेल्या शेजाऱ्यांना गर्भवती पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला असता, तिथले लोक पीडितेच्या घरात गेले, तेव्हा स्वातीचं शरीर रक्ताच्या थारोळ्यात होते. तसेच तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर तेच तुकडे एका बॅगेत भरून ठेवल्याचं चित्र दिसलं होतं. यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पती महेंद्रला बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा : भयंकर! आईनं 3 वर्षाच्या चिमुरडीसह स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

पतीनेच आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा स्थानिकांना संशय आला होता. त्यानंतर तो मृतदेह एका पिशवीत ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याची संधी शोधत होता. सध्या मृत महिलेच्या मेहुण्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत. एका आईच्या पोटात मुल वाढत असताना तिची हत्या करण्यात आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp