नवरा बाहेर गेला होता..रात्री तो व्यक्ती महिलेच्या रुममध्ये घुसला, दीराने पाहिलं अन् नंतर झालं मोठं कांड!

Today Shocking News :  उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका महिलेच्या घरी अज्ञात व्यक्ती घुसला अन् मोठं कांड घडलं. महिलेचा पती कामानिमित्त घरातून बाहेर गेला होता.

पत्नीला पाहिलं दुसऱ्याच पुरुषासोबत अन् संतापलेल्या पत्नीने थेट चाकूने...
Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तो व्यक्ती महिलेच्या रुममध्ये घुसला अन् नंतर घडलं

point

पोलिसांनी तरुणाविरोधात केला गुन्हा दाखल

point

नेमकं घडलं तरी काय?

Today Shocking News :  उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका महिलेच्या घरी अज्ञात व्यक्ती घुसला अन् मोठं कांड घडलं. महिलेचा पती कामानिमित्त घरातून बाहेर गेला होता. रात्रीची वेळ होती आणि वहिनीच्या रुममधून अज्ञात व्यक्तीचा आवाज येत होता. त्यानंतर दीराला अचानक जाग आली आणि त्याची सटकली. त्याने आतमध्ये जे काही पाहिलं, त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने आरडाओरडा सुरु केला. ही धक्कादायक घटना गोरखपूरच्या गुलरिहा परिसरात घडली. 

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?

दीराने आरडाओरडा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. महिलेला भेटायला आलेला व्यक्ती घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे त्याचा पाय मोडला आणि तो जखमी झाला. हाडे मोडल्यानंतरही तो तिथून निसटला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गावातील लोकांनी त्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. महिलेनं पुन्हा घरच्या लोकांसोबत तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा >> कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?

दरम्यान, गुलरिहा पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. महिलेच्या दीराचं म्हणणं आहे की, रात्री जाग आल्यावर पाहिलं की, एक व्यक्ती रुममध्ये घुसला होता. भाऊ बाहेर होता, म्हणून मला संशय आला. जेव्हा मी रुममध्ये जाऊन पाहिलं, तेव्हा तिथे तो व्यक्ती होता. पण वहिनी झोपेत होती. मी हे पाहिल्यावर आरडाओरडा केला. तेव्हा तो व्यक्ती पळून गेला. मी पण त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडली मारली आणि तो जखमी झाला. 

महिलेनं काय म्हटलं?

गोरखपूरच्या एका रुग्णालयात आरोपीवर उपचार सुरु आहेत. माझा पती मजुरी करण्यासाठी बाहेर गेला होता. घराच्या दुसऱ्या मजल्यावर मी मुलांसोबत झोपले होते. त्यावेळी एक व्यक्ती आमच्या रुममध्ये घुसला. दीराने हे पाहिल्यावर त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि तो जखमी झाला. 

हे ही वाचा >> विकृतीचं टोक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् जेल, चौदा वर्षानंतर आला बाहेर अन् दुसऱ्याच पीडितेवर...सुरूच खेळ

हे वाचलं का?

    follow whatsapp