पतीने केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं! रात्री दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीने साडीनेच...
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एका महिलेने तिच्या साडीच्या पदरानेच पतीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

पती त्या रात्री दारू पिऊन घरी आला अन्...

पत्नीने कसलाच विचार न करता केलं भयानक कृत्य
Crime news: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या साडीच्या पदरानेच पतीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. दारूचं व्यसन आणि कौटुंबिक वाद हेच हत्येचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स उघडीस आल्यानंतर, मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक असून तिला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिली माहिती
ही घटना कटरा बाजार परिसरातील कस्बा पहाडापुर येथे घडल्याची माहिती आहे. येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय शिवम शुक्लाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात माहिती देताना पीडित शिवमची हत्या त्याची पत्नी निशा शुक्लाने केल्याचं सांगितलं. पोलिसांनी हत्या करताना वापरण्यात आलेली साडी जप्त केली असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा: Govt Job: आता लेखी परीक्षेशिवाय मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी! 'या' पदांसाठी निघाली भरती... कुठे कराल अप्लाय?
रात्री दारू नशेत घरी आला अन्...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि तिच्या पत्नीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. 16 ऑगस्टच्या रात्री, गावात जन्माष्टमीचा कार्यक्रम पाहून शिवम रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी परतला. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झालं आणि हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. दरम्यान, रागाच्या भरात निशाने स्वतःच्या साडीने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी कॉल डिटेल्सची तपासणी केली असता दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग आढळला नाही.
हे ही वाचा: "'त्या' काँग्रेस नेत्याने केली माझ्यासोबत शारीरिक संबंधाची मागणी..." केरळच्या ट्रान्सजेन्डर कार्यकर्त्याचा दावा!
पतीचं भाकीत खरं ठरलं
चौकशीदरम्यान निशाने तिचा गुन्हा कबूल करत सांगितलं की शिवम दररोज दारू पिऊन घरी यायचा आणि दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. जन्माष्टमीच्या रात्री सुद्धा त्याने असंच केलं. यावेळी पीडित तरुणाच्या पत्नीने सर्व काही संपवण्याचा निर्णय घेतला. मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या दोन दिवस आधी शिवमने त्याच्या आईला सांगितलं होतं की "निशाला मी जिवंत नकोय, एक दिवस ती मला मारून टाकेल." तसेच, तक्रारीत वडिलांनी म्हटलं, "जर आम्हाला शिवमचे शब्द खरे ठरतील याची थोडी जरी कल्पना असती तर आम्ही निशाला तिच्या माहेरी पाठवलं असतं. निदान आमच्या मुलाचा जीव वाचला असता."