Govt Job: आता लेखी परीक्षेशिवाय मिळवा लाखोंच्या पगाराची नोकरी! 'या' पदांसाठी निघाली भरती... कुठे कराल अप्लाय?
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) कडून रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मुख्य संचालक (चीफ डायरेक्टर) आणि उपसंचालक (डेप्यूटी डायरेक्टर) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लेखी परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी
'या' पदांसाठी लवकरच करा अप्लाय...
Govt Job: कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय चांगल्या पदावरील नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) कडून रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मुख्य संचालक (चीफ डायरेक्टर) आणि उपसंचालक (डेप्यूटी डायरेक्टर) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी पात्र उमेदवार ncdc.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
काय आहे पात्रता?
नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन हे भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्यामुळे या क्षेत्रात थेट भरतीद्वारे नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे MBA/PGDM डिग्रीसोबत मार्केटिंगमध्ये स्पेशलाइजेशन असणं गरजेचं आहे. तसेच, उपसंचालक पदासाठी 5 वर्षे आणि मुख्य संचालक पदासाठी 15 वर्षांच्या कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
किती मिळेल पगार?
मुख्य संचालक म्हणजेच चीफ डायरेक्टर पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना लेव्हल-13 नुसार 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तसेच, लेव्हल-11 नुसार उपसंचालक म्हणजेच डेप्यूटी डायरेक्टर मार्केटिंग पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700 रुपये 2,08,700 रुपये इतका पगार मिळेल.
वयोमर्यादा
पदानुसार, या भरतीमध्ये 35 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.










