"'त्या' काँग्रेस नेत्याने केली माझ्यासोबत शारीरिक संबंधाची मागणी..." केरळच्या ट्रान्सजेन्डर कार्यकर्त्याचा दावा!
केरळच्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अवंतिका विष्णू यांनी केरळचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

बातम्या हायलाइट

काँग्रेस नेत्यावर लैंगिक छळाचा आरोप...

केरळच्या ट्रान्सजेन्डर कार्यकर्त्याचा धक्कादायक दावा
Crime News: केरळच्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अवंतिका विष्णू यांनी केरळचे काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल लैंगिक छळाचा आरोप केला आहे. NDTV च्या वृत्तानुसार, काँग्रेस नेत्याने पीडितेचा लैंगिक छळ केला आणि बलात्कार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याचं अवंतिका विष्णूने सांगितलं. सुरुवातीला आरोपीच्या राजकीय पदामुळे त्या घाबरत होत्या, मात्र, अभिनेत्री रिनी जॉर्जसह इतर महिलांनी असेच आरोप केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं.
नेत्याने फेटाळले त्याच्यावरील आरोप
दुसरीकडे, काँग्रेस नेते ममकूटाथिल यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, त्यांनी 22 ऑगस्ट रोजी सकाळी काँग्रेसच्या केरळ युवा शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं. तसेच, नेत्याने त्याच्यावर आरोप करणाऱ्या अभिनेत्री रिनी जॉर्ज, अवंतिका विष्णू आणि इतरांना न्यायालयात त्यांची बाजू मांडण्याची मागणी केली आहे.
"2022 मध्ये झाली ओळख"
'NDTV'शी बोलताना, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अवंतिका विष्णू म्हणाल्या की, जून 2022 मध्ये त्रिक्काकारा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांची राहुल ममकूटाथिलशी पहिली भेट झाली. पीडित कार्यकर्त्या म्हणाल्या, "केरळ पोटनिवडणुकीनंतर, कॉंग्रेस नेत्याने मला फेसबुकवर 'हाय' असा मेसेज केला आणि आमच्यात अगदी सामान्य संवाद झाला. त्यानंतर, त्याने मला टेलिग्रामवर मेसेज केला आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. तो त्याची वासनेची भावना पूर्ण करण्यासाठी बेंगळुरू किंवा हैदराबादमध्ये भेटीची मागणी करत होता."
हे ही वाचा: DMart मध्ये वस्तू इतक्या स्वस्त कशा मिळतात? कोणता दिवस पैशांच्या बचतीसाठी अधिक फायदेशीर?
"मोठ्या पदावर असल्याकारणाने गप्प राहिले"
आरोपी काँग्रेसचा मोठा नेता असल्याने त्या घाबरून गप्प राहिल्या असल्याचं पीडितेनं सांगितलं. तसेच, पीडितेला सायबर छळाचा देखील सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. इतर महिलांनी नेत्यावर आरोप केल्यानंतर तिला बोलण्यास प्रोत्साहित केले गेल्याचं पीडितेनं म्हटलं. त्या म्हणाल्या, "मला भीती आहे की तो त्याच्या शक्तीचा वापर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि त्याच्याविरुद्धची केस फिरवण्यासाठी करेल." तसेच, पीडितेनं सरकार, पोलिस आणि समाजाला स्वतःसाठी आणि ट्रान्स समुदायासाठी भावनिक आणि कायदेशीर मदतीचे आवाहन केलं.
हे ही वाचा: दोन मुलांची आई प्रियकरासोबत गेली पळून... थाटला नवा संसार अन् सापडल्यानंतर म्हणाली, "हाच माझा नवरा..."
रिनी जॉर्ज यांचे आरोप
रिनी जॉर्ज यांनी सुद्धा संबंधित आरोपीवर अशाच प्रकारचे आरोप केले. रिनी जॉर्ज म्हणाल्या, "मी सोशल मीडियाद्वारे त्या काँग्रेस नेत्याच्या संपर्कात आले. मला पहिल्यांदा म्हणजेच 3 वर्षांपूर्वी त्याच्याकडून आक्षेपार्ह मॅसेज मिळाले आणि तेव्हापासून त्याचं वाईट वर्तन सुरू झालं." तसेच, त्या राजकारण्याने भेटीसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बुक करण्याची ऑफरही दिली असल्याचा त्यांनी दावा केला. दरम्यान, काँग्रेस नेता ममकुताथिल याने सर्व आरोप फेटाळले असून त्याने अवंतिका विष्णू यांच्या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.