DMart मध्ये वस्तू इतक्या स्वस्त कशा मिळतात? कोणता दिवस पैशांच्या बचतीसाठी अधिक फायदेशीर?
डीमार्ट स्टोअर्समधील वस्तूंच्या किमती इतर दुकानांपेक्षा नेहमीच कमी का असतात? आणि तिथे खरेदी करण्यासाठी चांगला दिवस कोणता? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
DMart मध्ये वस्तू इतक्या स्वस्त कशा मिळतात?
कोणत्या दिवशी मिळतील अधिक स्वस्त वस्तू?
DMart Shops: आपल्यापैकी बरेचजण डीमार्ट (DMart) मधून घरातील वस्तू खरेदी करणं पसंत करतात. कारण इतर दुकानांच्या तुलनेत डीमार्टमध्ये वस्तूंची किंमत स्वस्त असल्याचं सांगितलं जातं. अशातंच, डीमार्ट स्टोअर्समधील वस्तूंच्या किमती इतर दुकानांपेक्षा नेहमीच कमी का असतात? आणि तिथे खरेदी करण्यासाठी चांगला दिवस कोणता? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. खरंतर, वस्तूंच्या कमी किमती हीच सर्वात मोठी ताकद आणि जाहिरात असल्याचं डीमार्टचं मत आहे. ते मोठे डिस्काउंट्स, फेस्टिव्ह ऑफर्स किंवा 'एक खरेदी करा, एक मोफत मिळवा' असे प्रमोशन करत नाहीत. त्याऐवजी, ते वर्षभर बाजारभावापेक्षा कमी किंमतीत प्रत्येक वस्तू विकतात.
स्वत:च्या जमिनीवर स्टोअर्स
यामुळे कोणत्याही दिवशी स्टोअरमध्ये गेलो तरी स्वस्त वस्तू मिळतील, ग्राहकांना असा विश्वास वाटतो. डीमार्टच्या याच पॉलिसीमुळे, लोक कोणत्याही विशेष ऑफरची वाट न पाहता गरज पडल्यास तिथे खरेदी करण्यासाठी जातात. डीमार्टची बहुतेक दुकानं (90 टक्क्यांपेक्षा जास्त) त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर बांधलेली आहेत. इतर दुकाने भाड्याने जागा घेतात, ज्याची किंमत खूप जास्त असते. पण डीमार्ट स्वतःची जमीन खरेदी करून त्यावर स्टोअर्स बांधतं. यामुळे त्यांचं भाडं पूर्णपणे वाचतं. सुरुवातीला ही एक मोठी गुंतवणूक असते, परंतु दीर्घकाळात यामुळे खूप बचत होते. ग्राहकांना या बचतीचा फायदा वस्तूंच्या कमी किमतीच्या स्वरूपात मिळतो.
वस्तू सोप्या आणि योग्य पद्धतीने ठेवल्या जातात
तसेच, डीमार्ट टीव्ही, वर्तमानपत्रे किंवा रेडिओवर मोठ्या जाहिराती देत नाही. त्यांच्या मते, वस्तूंच्या कमी किमती हीच त्यांची जाहिरात आहे. यामुळे जाहिरातींचा खर्च वाचतो. डीमार्टच्या स्टोअर्समध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फॅन्सी सजावट मिळणार नाही. पण, ग्राहकांना त्या वस्तू सहज घेता याव्यात म्हणून त्या सोप्या आणि योग्य पद्धतीने ठेवल्या जातात. दुकानांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या देखील आवश्यकतेनुसार कमी ठेवली जाते. यामुळे दुकान चालवण्याचा खर्च खूप कमी राहतो. डीमार्ट त्यांच्या पुरवठादारांना लवकर पैसे देतात आणि कधीकधी वस्तू मिळाल्यानंतर काही दिवसांतच पैसे देतात. इतर पुरवठादारांचे पैसे चुकवण्यासाठी इतर दुकाने तुलनेने अधिक वेळ घेतात. यामुळे पुरवठादार खूश राहतात आणि ते डीमार्टला कमी किमतीत वस्तू पुरवतात, ज्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होतो.
हे ही वाचा: दोन मुलांची आई प्रियकरासोबत गेली पळून... थाटला नवा संसार अन् सापडल्यानंतर म्हणाली, "हाच माझा नवरा..."
वस्तू लवकर विकल्या जातात
डीमार्टचं सामान लवकर विकलं जातं आणि त्यातील बहुतेक सामान तर 30 दिवसांच्या आतच विकलं जातं, यामुळे जुना किंवा खराब झालेला माल राहत नाही आणि गोदामाचा खर्च वाचतो तसेच, ग्राहकांना नेहमीच ताजा माल विकत घेता येतो. डीमार्टमध्ये वर्षभर म्हणजे दररोज वस्तूंची किंमत बाजारभावापेक्षा कमी असते. म्हणून, डीमार्टमध्ये खरेदीसाठी कोणताही विशेष दिवस नाही.










