'त्या' कारणामुळे केली पत्नीची हत्या, नंतर मृतदेह जमिनीत पुरला अन् स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये जाऊन... नेमकं प्रकरण काय?
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने तिचा मृतदेह जमिनीत पुरला. हत्येमागचं नेमकं कारण काय?

बातम्या हायलाइट

आधी पत्नीची हत्या अन् नंतर मृतदेह जमिनीत पुरला

आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंदवली बेपत्ता असल्याची तक्रार...
Murder Case: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने तिचा मृतदेह जमिनीत पुरला आणि त्यानंतर त्याने स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. सध्या आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
दोघांमधील वादामुळे केली पत्नीची हत्या
पती आणि पत्नीमधील कौटुंबिक वाद हेच या हत्येमागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. तसेच, पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह जमिनीत पुरला आणि त्यानंतर पोलस स्टेशनमध्ये जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. हिंगणघाट पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणासंदर्भात हे मोठं रहस्य उघडकीस आलं.
हे ही वाचा: "'त्या' काँग्रेस नेत्याने केली माझ्यासोबत शारीरिक संबंधाची मागणी..." केरळच्या ट्रान्सजेन्डर कार्यकर्त्याचा दावा!
पोलिसांच्या चौकशीदरम्यान पतीवर संशय...
20 दिवसांपूर्वी हिंगणघाटच्या इंदिरा वॉर्ड परिसरात वास्तव्यासाठी आलेल्या सुभाष लक्ष्मण वैद्य याने 19 ऑगस्ट रोजी हिंगणघाट पोलिसांकडे त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी पती पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करत असल्याचं पोलिसांना लक्षात आलं आणि त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याच वेळी, मृत पावलेल्या माधुरीच्या नातेवाईकांनीही पतीवर संशय व्यक्त केला.
हे ही वाचा: DMart मध्ये वस्तू इतक्या स्वस्त कशा मिळतात? कोणता दिवस पैशांच्या बचतीसाठी अधिक फायदेशीर?
खड्ड्यात मृतदेह आढळला
काही दिवसांपूर्वी घराजवळ पावसाचं पाणी बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने खोल खड्डा खोदण्यात आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. आता इतका खोल खड्डा का खोदला गेला तसेच तो कोणी आणि कसा भरला? असे प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाची मदत घेतली. त्याठिकाणी पुन्हा खड्डा खोदला असता त्यात पेलिसांना मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतलं असून सुभाष सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.