मुंबईची खबर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमकं कधी सुरू होणार? सिडको अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट...

नवी मुंबईत बांधलं जाणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या एअरपोर्टचं काम जवळपास पूर्ण झालं असून हे विमानतळ कोणत्या तारखेपासून कार्यान्वित होणार? याबाबत माहिती समोर आली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमकं कधी सुरू होणार?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमकं कधी सुरू होणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईचं विमानतळ कधीपासून कार्यान्वित होणार?

point

सिडको अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट

Mumbai News: नवी मुंबईत बांधलं जाणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हे विमानतळ मुंबई, कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागांसाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या एअरपोर्टचं काम जवळपास पूर्ण झालं असून हे विमानतळ कोणत्या तारखेपासून कार्यान्वित होणार? याबाबत माहिती समोर आली आहे. या विमानतळाचं उद्घाटन यावर्षी ऑक्टोबर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, दोन महिन्यांनंतर हे विमानतळ कार्यान्वित होणार असल्याची माहिती आहे. 

तिसऱ्यांदा बदलली तारीख

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधी जून आणि नंतर सप्टेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली होती. परंतु आता विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यात त्याचे उद्घाटन होईल असे सांगण्यात आलं आहे. विमानतळाचं काम अद्याप पूर्ण न झाल्याने उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

हे ही वाचा: पतीने केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं! रात्री दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीने साडीनेच...

इतके प्रवासी करू शकतील प्रवास 

नवी मुंबईचं हे विमानतळ व्यवसायाचं एक प्रमुख केंद्र बनणार असल्याची चर्चा आहे. तसेच या विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्टिव्हिटी वाढेल आणि महाराष्ट्राला नवीन व्यवसायाच्या संधींचा फायदा होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची एकूण क्षमता सुमारे 30.2 लाख टन मालवाहतूक इतकी असेल. दरवर्षी या विमानतळावरून एकूण 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. या विमानतळावर कार्गो टर्मिनल, टी-1 टर्मिनल आणि दोन टॅक्सीवे अशा बऱ्याच सुविधा असतील. 

हे ही वाचा: 'त्या' कारणामुळे केली पत्नीची हत्या, नंतर मृतदेह जमिनीत पुरला अन् स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये जाऊन... नेमकं प्रकरण काय?

डिसेंबरच्या अखेरीस होणार कार्यान्वित 

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या नवी मुंबईत हे विमानतळ बांधण्यात येत असून त्यातील काही टेक्निकल बाबी पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे अद्याप नवी मुंबई विमानतळावरून कोणत्याही विमानाचं उड्डाण झालेलं नाही. उर्वरित तांत्रिक बाबी या महिन्यात पूर्ण होणार असून डिसेंबरच्या अखेरीस विमानतळावरून उड्डाणे सुरू होणार असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp