जे घडतंय ते भयंकर.. आठवीतील विद्यार्थ्याने वर्गातल्या मुलावर केले चाकूने वार, कारण...

मुंबई तक

School Students Shocking News : गुजरातच्या महीसागर जिल्ह्यातील एका शाळेच्या बाहेर किरकोळ वादातून धक्कादायक घटना घडली. एका विद्यार्थीनीने तिच्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुजरातच्या सरकारी शाळेत घडली धक्कादायक घटना

point

शाळकरी मुलीनं विद्यार्थ्यावर केला चाकूने हल्ला

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

School Students Shocking News : गुजरातच्या महीसागर जिल्ह्यातील एका शाळेच्या बाहेर किरकोळ वादातून धक्कादायक घटना घडली. एका विद्यार्थीनीने तिच्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला केला. ही धक्कादायक घटना अहमदाबादच्या एका शाळेत घडली. काही दिवसांपूर्वी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची याच ठिकाणी हत्या झाली होती. दरम्यान, याप्रकरणी एका अधिकाऱ्याने म्हटलं की, बालासिनोर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी एका विद्यार्थीने तिच्या वर्गमित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला. 

पोलीस अधिक्षक जयदीपसिंह जडेजा यांनी म्हटलं की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी किशोर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी म्हटलं की, बालासिनोर पोलिसांनी शुक्रवारी आरोपी किशोर विरोधात भारतीय न्याय संहितेचं कलम 115  आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा >> बीड: एक बॉयफ्रेंड आणि दोघी जणी... होमगार्ड महिला 'त्याच्या' जवळ गेली अन् मैत्रिणीने केलं भलतंच!

जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटलं की, एका किरकोळ गोष्टीवरून त्यांच्या मुलावर हल्ला करण्यात आला. माझ्या मुलाच्या मैत्रिणीने छोट्या गोष्टीवरून राग मनात धरत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. माझ्या मुलाच्या पोटावर, पाठीवर आणि खांद्यावर चाकूने वार करण्यात आला आहे. अहमदाबादच्या खोखरा परिसरात सेवेन्थ डे एडवेंटिस्ट मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक धक्कादायक घटना घडली होती. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच क्लासमेटने चाकूने वार करत हत्या केली होती.

त्या अल्पवयीन मुलासोबतही घडला होता धक्कादायक प्रकार

उदयपूरच्या पोक्सो (POCSO) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय सुनावला होता. कोर्टाने अल्पवयीन मुलासोबत लैंगिक शोषण करणाऱ्या दोषी महिलेला 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. याचसोबत महिलेला 10 हजार रुपयांचं दंडही ठोठावलं होतं. विशेष बाब म्हणजे, उदयपूरचं हे पहिलं प्रकरण आहे, ज्यामध्ये पोक्सो कोर्टाने एखाद्या महिलेला दोषी ठरवत एवढी शिक्षा सुनावण्यात आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp