हे काय भलतंच? पोलीस कॉन्स्टेबल घरात घुसला अन् महिलेचे अंतर्वस्त्र चोरून पळाला...
Today Shocking Viral News : एक पोलीस कॉन्स्टेबल घरात घुसला आणि एका महिलेची खासगी गोष्ट चोरी करून पळाला. ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

बातम्या हायलाइट

पोलिसाने एका महिलेची इनरविअर चोरली अन्..

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?

घडलेली घटना निषेधार्ह..वरीष्ठ अधिकारी काय म्हणाले?
Today Shocking Viral News : एक पोलीस कॉन्स्टेबल घरात घुसला आणि एका महिलेची खासगी गोष्ट चोरी करून पळाला. ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. सर्वांना थक्क करणारी ही घटना इंग्लंडच्या हर्टफोर्डशायर येथे घडली. त्या पोलिसाने महिलेची गुलाबी रंगाची इनरविअर चोरली आणि ती पँटमध्ये ठेऊन तो तिथून फरार झाला.
या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच आरोपी कॉन्स्टेबलची तलाशी घेण्यात आली. महिलेची अंडरविअर चोरण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. घरात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये अधिकारी मार्सिन जिलिंस्कीने एक दरवाजा उघडून गुलाबी रंगाच्या अंडरविअरची एक जोडी चोरली. त्याने रूमच्या बाहेर निघण्याआधी इनरविअर पँटच्या खिशात ठेवली.
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
द इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार, ही घटना मागच्या वर्षी 12 सप्टेंबरल घडली होती. जेव्हा महिलेला ताब्यात घेण्यात आलं होतं. ज्या पीडित महिलेला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि चौकशीसाठी हैटफील्ड पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलं होत. जिलिंस्कीला पदाचा गैरवापर केल्यामुळे चार महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर महिलेला पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं नाही.
हे ही वाचा >> बीड पुन्हा हादरलं! बॉयफ्रेंडसाठी दोन मैत्रिणींमध्ये रंगला खुनाचा थरार! एकीने होमगार्ड महिलेला संपवलं, मृतदेह नाल्यात फेकला अन्...
घडलेली घटना निषेधार्ह..वरीष्ठ अधिकारी काय म्हणाले?
हर्टफोर्डशायर कॉन्स्टेबुलरीचे वरिष्ठ अधिकारी गेना टेल्फरने म्हटलंय की, जी घटना घडली, तिचा निषेधार्ह आहे. जीलिंस्कीने हर्टफोर्डशायरच्या जनतेला आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांना नाराज केलं आहे. त्यांच्या अनैतिक व्यवहारामुळे पोलिसांच्या प्रतिष्ठेचं नुकसान झालं आहे. जनता आणि निती मूल्यांचा विश्वासघात केल्यासारखं त्यांनी केलं. जनतेची सेवा करणं हे पोलिसांचं काम असतं.
त्या ठिकाणीही घडला होता धक्कादायक प्रकार
उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये जिमला गेलेल्या एका डॉक्टरची मुलगी आणि भाचीचा तरुणाने अश्लील व्हिडीओ बनवला होता. तरुणाने हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांना दिली होती. तसच डॉक्टरच्या मुलाला मारहाण करून त्याच्यावर बंदूकही ताणली होती. पीडित डॉक्टरने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. घटनेनंतर डॉक्टर कुटुंबीय खूप घाबरले आणि त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली.