अल्पवयीन गुन्हेगाराकडून दहा वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकूने अठरा वेळा सपासप वार, क्राईम सीरीज पाहून केलं कांड, नेमकं काय घडलं?
Crime news : एका चिमुरडीची 18 ऑगस्ट रोजी धारदार चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली. आरोपी हा इयत्ता दहावीतील विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्या हायलाइट

10 वर्षाच्या मुलीची हत्या

पोलिसांमुळे प्रकरण आलं समोर

अल्पवयीन मुलाला अटक

नेमकं प्रकरण काय?
Crime news : हैदराबादच्या कुकटपल्ली येथे एका 10 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. संबंधित प्रकरण पोलिसांमुळे समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. एका चिमुरडीची 18 ऑगस्ट रोजी धारदार चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली. आरोपी हा इयत्ता दहावीतील विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?
गुन्हा करण्यासाठी रचला मोठा कट
मुलाने गुन्हा करण्यासाठी मोठा कट रचला होता. चोरी कशी करायची? जर कोणी तिथे असेल तर प्लॅन बीनुसार त्याला कसे मारता येईल, यासाठी त्याने एक चाकूही ठेवला होता. दरम्यान, सीसीटीव्हीत आपला चेहरा दिसू नये यासाठी त्याने एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारली आणि तिथून खाली उतरण्याचा त्याने प्लानिंग केला. त्यानंतर घरात पोहोचल्यानंतर त्याने देवघरातील पन्नास हजार रुपये काढून घेतले.
18 वेळा सपासप वार
घरी कोणीतरी आहे हे त्याला माहिती नव्हते, तेव्हाच अचानकपणे सहस्त्रा ही बाथरूममधून बाहेर आली आणि तिनं मुलाला चोरी करताना पाहिले असता, तिनं आपल्या वडिलांना नाव सांगेल असं त्या चोरी करणाऱ्या मुलाला सुनावलं. त्यानंतर मुलाने सहस्त्राच्या गळ्यावर चाकूने 18 वेळा सपासप वार करत गळा चिरला.
हत्येनंतर मुलगा आपल्या घरी गेला. घरात रक्ताने माखलेला चाकू आणि कपडे त्याने लपवून ठेवले होते. पोलिसांनी मुलाच्या आईसमोरच घराची झडती घेण्यास सुरुवात केली आणि काही वस्तू जप्त केल्या. दरम्यान, खून करण्यात आलेल्या मुलीचे वडील हे मॅकॅनिक आहेत. तसेच आई ही नर्सिंग होममध्ये कार्यरत आहे. रात्री उशिरा सहस्त्राचे वडील घरी गेले असता, रात्री 12:30 वाजता पीडितेचं शव बिछान्यावर पडलेलं होतं.
हे ही वाचा : Personal Finance: कठीण काळात सर्वात मोठा आधार म्हणजे तुमचा आपत्कालीन फंड, पण नेमका ठेवायचा कुठे?
दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाबाबत सांगितलं की, मुलगा शाळेत शिक्षण जरी घेत असला तरी तो वेगळ्या वळणाला आहे. त्याची आई दुकान चालवते आणि घराचा उदरनिर्वाह करते. तर त्याचे वडील दारूडे आहेत. तर सोशल मीडियावर क्राईम कंटेट पाहूनच असं कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.