पत्नी होती जिमला अन् बिजनेस पार्टनर पती एकटाच होता घरात, नंतर पत्नी येताच रक्ताच्या थारोळ्यात पती, नेमकं काय घडलं?
Indore Crime : शुक्रवारी सकाळी शहरातील एका मिलन हाइट्स स्किम नंबर 140 येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यवसायिक चिराग जैन यांची त्यांच्याच घरात चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली. मिळालेल्या घटनेनुसार दोघेही बिजनेस पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या हायलाइट

पत्नी जिमला गेल्यानंतर पतीचा घरात मृतदेह

चाकूने सपासप केले वार

नेमकं काय घडलं?
Indore Crime : इंदूरच्या कानडिया परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील एका मिलन हाइट्स स्किम नंबर 140 येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यवसायिक चिराग जैन यांची त्यांच्याच घरात चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली. मिळालेल्या घटनेनुसार दोघेही व्यवसायिक जोडीदार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा प्यायली अन् थेट व्हेटिंलेटवर उपचार सुरु, नेमकं विद्यार्थिनीसोबत काय घडलं?
चिरागची पत्नी जिमला गेली असताना, हा धक्कादायक प्रकार
घटनेच्या वेळी चिरागची पत्नी जिमला गेली असताना, हा धक्कादायक प्रकार घडला. जिममधून परतल्यानंतर पत्नीला आपल्याच घरात रक्ताचे डाग दिसले आणि रक्ताच्या थारोळ्यात तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांना तातडीने कळवण्यात आले. तेव्हात घटनेनंतर चिरागचा 10 वर्षांचा मुलगा घरी आला होता, त्याने संपूर्ण घटना पाहिली आणि नंतर पोलिसांना या घडलेल्या घटनेबाबत सांगितले की, वडिलांचा बिजनेस पार्टनर विवेक घरी आला होता.
मुलाची साक्ष महत्त्वाची
या घटनेत मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली होती. मुलाच्या साक्षीनंतर पोलिसांनी विवेक जैनला मुख्य आरोपी मानून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चिरागचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावेही जप्त करण्यात आले आणि त्याचा सध्या तपास सुरू आहे.
हे ही वाचा : कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरात दोन्ही गटात तुफान राडा, आधी दगडफेक नंतर वाहनंच पेटवली, पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?
बिजनेस पार्टनर असल्याने पैशांवरून तणाव
पोलिसांचं म्हणणं आहे की, चिराग आणि विवेक हे बिजनेस पार्टनर असल्याने दोघांमध्ये पैशांवरून बराच काळ तणाव निर्माण झाला होता, यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आणि चिरागच्या पत्नी आणि मुलाचे जबाब नोंदवण्यात आले आहे. या घडलेल्या घटनेनं इंदूरमध्ये खळबळ माजली आहे.