इंस्टाग्रामवर मैत्री केली तीच चूक झाली, ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर गँगरेप
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने पीडितेसोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

इंस्टाग्रामवर झाली मैत्री आणि तरुणीला आमिष दाखवून...

ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार
Gang rape case: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रकरणातील पीडित महिला भिंड येथील रहिवासी असून संबंधित घटना ग्वाल्हेरमधील महाराजपुर पोलीस स्टेशन परिसरात घडल्याची माहिती आहे. एका तरुणाने पीडितेसोबत इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेला ग्वाल्हेरमध्ये बोलावलं आणि तिथे त्याने आपल्या चुलत भावासोबत मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. संबंधित तरुणी ही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे.
इतकेच नव्हे, तर पीडितेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी महिलेला ब्लॅकमेल करू लागला. घटनेच्या वेळी आरोपी तरुणांच्या तावडीतून ती महिला कशीबशी सुटली आणि भिंड येथे पोहोचली. त्यानंतर संबंधित महिलेने तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणातील 30 वर्षीय पीडितेची मेहगाव येथील रहिवासी राज जाटवशी पाच महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. हळूहळू दोघांमधील संवाद वाढत गेला आणि नंतर तिने तिचा फोन नंबर त्या तरुणाला दिला असल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं.
बिझनेस वाढवण्याचं आमिष दाखवलं
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, काही काळानंतर राज पीडिता राहत असलेल्या कॉलनीत भाड्याने राहू लागला. तो तिला दररोज भेटू लागला. संबंधित महिला भिंडमध्ये तिचं ब्युटी पार्लर चालवते. त्यावेळी राजने तिला तिचा व्यवसाय वाढवण्याचं आमिष दाखवलं आणि ग्वाल्हेरमध्ये तिच्यासाठी एक मोठं, आलिशान ब्युटी पार्लर उघडेल, असं खोटं आश्वासन दिलं. या काळात राजने पीडितेला आपल्या प्रेमात पाडलं आणि त्याने स्वत:च्या नावावर एक बाइक सुद्धा फायनान्स करून घेतली.
हे ही वाचा: कोरड्या विहिरीत आढळला मृतदेह! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीच्या हत्येची प्लॅनिंग अन् 60 वर्षांच्या पतीलाच...
अश्लील व्हिडीओ सुद्धा बनवला
पीडितेने या बाइकचं 20,500 रुपये डाउन पेमेन्ट केलं आणि आता तिच या बाइकचे हप्ते सुद्धा भरत आहे. आरोपी राज आणि त्याचा चुलत भाऊ शिवम महिलेला ग्वाल्हेरला घेऊन गेले. आरोपींनी महिलेच्या घरातील वस्तू आणि ब्युटी पार्लरच्या वस्तू सुद्धा पळवून नेल्या. त्यानंतर त्यांनी तिच्यासाठी डीडी नगरमध्ये एका खोलीची व्यवस्था केली आणि तिथेच सहा दिवसांनंतर राज आणि शिवम यांनी महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान, आरोपींनी पीडितेचा अश्लील व्हिडीओ सुद्धा बनवल्याचा आरोप आहे.