सासूला Ex-Air Hostess सुनेचा वैताग आला होता..सुनेनं कुटाकुटी केल्यावर सासू थेट गेली कोर्टात अन् नंतर घडलं..
Today Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये एका वृद्ध महिलेनं कोर्टात सुनेविरोधात याचिका दाखल केलीय. सून घरातल्या माणसांचा छळ करते, असं तिने कोर्टात सांगितलं.

बातम्या हायलाइट

प्रतिवादी सतत कोर्टात गैरहजर राहिल्याने कोर्टाने दिला हा निर्णय

सुनेनं सासूला घरात केली मारहाण अन् नंतर घडलं..

त्या गावात नेमकं काय घडलं होतं?
Today Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये एका वृद्ध महिलेनं कोर्टात सुनेविरोधात याचिका दाखल केलीय. सून घरातल्या माणसांचा छळ करते, असं तिने कोर्टात सांगितलं. त्यानंतर न्यायधिशांनी सुनेला एक बॉन्ड भरून द्यायलं सांगितलं, ज्यात लिहिलं होतं की, ती तिच्या सासूला त्रास देणार नाही. तसच एक आदेशही दिला की, जोपर्यंत ती बॉन्ड भरून देत नाही, तोपर्यंत ती साससोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क साधणार नाही.
जिल्हा न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट (JMFC)कडून घरगुती हिंसेबाबत सासूने सुनेविरोधात दाखल केलीली याचिका स्वीकारण्यात आली. सासूने तिच्या सुनेवर 6 ऑगस्टच्या संध्याकाळी तिच्या घरी जबरदस्ती घुसून तिला मारहाण केली. त्यानंतर सासूने वकिलाच्या माध्यमातून घरगुती हिंसाचारातून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 नुसार कोर्टात याचिका दाखल केली.
प्रतिवादी सतत कोर्टात गैरहजर राहिल्याने कोर्टाने दिला हा निर्णय
याप्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या त्यांच्या आदेशात म्हटलं की, सुनेनं तिच्या सासूवर घरात घुसून हिंसाचार केला, असं प्रथमदर्शनी निदर्शनास येतंय. JMFC न्यायालयाने याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, प्रतिवादी सतत गैरहजर राहिल्याने एका पक्षाच्या बाजूने आदेश पारित केला.
हे ही वाचा >> ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं
या नोटिसमध्ये असं म्हटलं की, सुन घरगुती हिंसा करून सासूला त्रास देणार नाही, असा बॉन्ड भरून कोर्टात दाखल करेल. रिपोर्टनुसार, पीडित महिला खजराना परिसरात राहते. तिच्या मुलाने 2020मध्ये एका तरुणीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर मुलगा सासरी राहायला लागला. यामुळे नाराज झालेल्या महिलेनं मुलगा आणि सूनेशी सर्व नातं तोडलं. त्यानंतर मुलगा आणि सूनेमध्ये वादविवाद होऊ लागले.
मुलगा वेगळा राहू लागला आणि दोघांमध्ये घटस्फोटाची केसही सुरु असल्याचं समजते. पीडित महिलेचे वकील आशिष एस. शर्मा यांनी म्हटलंय की, महिलेचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार कौटुंबिक वादविवाद होतात. त्यामुळे दोघे वेगळे राहतात. सासूसोबत घरगुती हिंसाचाराचा आरोप असणारी सून एअर होस्टेस राहिलेली आहे. तिने पीडित महिलेच्या मुलासोबत 2020 मध्ये प्रेमविवाह केला होता.