'माझ्यासोबत झोपायला चल...' पतीची पत्नीकडं मागणी, पत्नीनं दिला नकार अन् नंतर कुऱ्हाडीनेच तोडलं
crime news : पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत खून केला आहे. मेहुण्याच्या जाण्याने कुटुंबात शोकाकुल वातावरण होतं. या खूनामागील कारण आता समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने केला हल्ला

कारण ऐकून चक्रावून जाल
Crime News : नवरा आणि बायकोच्या नात्यांमध्ये वादविवाद होणं हे साहजिकच असतं. पण हा वाद टोकाला पोहचू नये म्हणजे झालं. जर हा वाद टोकाला पोहोचल्यास होत्याचं नव्हतं होऊन बसतं. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील खंडवा येथून समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत खून केला आहे. मेहुण्याच्या जाण्याने कुटुंबात शोकाकुल वातावरण होतं. खून झालेल्या पत्नीचं नाव मालती असे आहे, तर खून केलेल्या आरोपीचं नाव धर्मेंद्र असे आहे. या खूनामागील कारण आता समोर आलं आहे.
हे ही वाचा : गणपती बाप्पाच्या मूर्ती पुराच्या पाण्यात, मूर्तीकार महिलेचा टाहो तुमचंही काळजी टाकेल पिळवटून
पत्नीवर झोपेतच कुऱ्हा़डीने वार
धर्मेंद्रने आपल्या पत्नी मालतीला एकत्र झोपू असं सांगितलं होतं. पण मालतीने धर्मेंद्रला एकत्र झोपण्यास नकार दिला. घरात अनेक लोक असल्याने एकत्र झोपणे हे योग्य वाटणार नाही, असे मालतीचं म्हणणं होतं. याच मुद्द्यावरून धर्मेंद्रने मालतीवर कुऱ्हाडीने झोपेतच घाव घालत हल्ला केला असता, त्यानंतर पती धर्मेंद्र तिथून पळून निघून गेला. पोलिसांनी संबंधित प्रकरणात आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संबंधित प्रकरणात आरोपीने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. जेव्हा त्याने पोलिसांना हत्येचे कारण सांगितले तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
मालती रक्षाबंधनासाठी सण साजरा करण्यासाठी तिच्या माहेरी गेली होती. तिचा मेहुणा ताराचंद हा दोन महिन्यांपूर्वीच मरण पावला होता, त्यानंतर ती तिच्या सासरी पुन्हा परतली होती. घरात शोकाकुल वातावरण होते. घरात सर्वत्र पाहुणे होते. तेव्हाच धर्मेंद्रने आपल्या पत्नीला एकत्र सोबत झोपायला सांगितले. पण लोकांच्या गर्दीमुळे तिने झोपण्यास नकार दिला. त्यानंतर ती घरात दुसऱ्या ठिकाणी झोपली होती. यामुळे पती धर्मेंद्र रागाने लालबुंद झाला होता.
हे ही वाचा : Pune Crime : अल्बममध्ये काम देतो असं सांगितलं, घाटात शूटींगही झालं, नंतर फ्लॅटवर नेत तोडले लचके अन्...
तेव्हा आरोपीने धर्मेंद्रने झोपण्यास नकार दिला. त्याने गाढ झोपेतच पत्नीवर कुऱ्हाडीने दोनदा घाव घातले आणि तिची हत्या केली. आरडाओरड करत उपस्थित जागे झाले असता, मालतीचा मृतदेह ह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच आरोपी पती धर्मेंद्रच्या मुसक्या आवळण्यात आल्या.