वासनेनं बरबटलेली महिला, जावयासह भाऊजीशी शारीरिक संबध; पतीला समजलं अन्...

मुंबई तक

Crime News : एका महिलेनं आपल्या जावयासह भाऊजीसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. जेव्हा संबंधित घटनेची माहिती पतीला कळाली असता, पत्नीने टोकाचं पाऊल उचलून सर्व नातेवाईकांना हादरून टाकले आहे.

ADVERTISEMENT

crime news woman had sexual intercourse with brother-in-law and son-in-law
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं पतीला दिलं सोडून

point

नंतर जावई आणि भाऊजीसोबत ठेवले संबंध

point

नेमकं काय घडलं?

Crime News : देशभरात मोठ्या प्रमाणात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक संबंध निर्माण झाल्याचे दिसून येऊ लागले आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या जावयासह भाऊजीसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. जेव्हा संबंधित घटनेची माहिती पतीला कळाली असता, पत्नीने टोकाचं पाऊल उचलून सर्व नातेवाईकांना हादरून टाकले आहे. ही घटना बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज पोलीस ठाणे परिसरातील आहे. 

हे ही वाचा : पालघरमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती, पोल्ट्री फर्ममधून असंख्य कोंबड्या गेल्या वाहून, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

पुनिताचे जावयाशी नंतर मेहुण्याशी अवैध संबंध 

संबंधित प्रकरणात महिलेनं मुरलीगंज पोलीस ठाणे गाठले, त्या महिलेचे नाव उर्मिला देवी असे आहे. तिने सांगितलं की तिचा मुलगा जसवंत यादव आणि सून पुनिता देवीचे जावई अमित कुमार आणि मेहुणा राजेश यादव यांच्याशी अवैध संबंध होते. जसवंतने या नातेसंबंधाला विरोध केला असता, पुनिताने तिच्या बॉयफ्रेंडसह तिच्या पतीची हत्या केली, ती दुसरी तिसरी कोणीही नसून पुनितची सासू असल्याचं बोललं जातंय. 

पुनिताने तिच्या 12 - 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अमित नावाच्या तिच्या प्रियकराशी  लग्न लावून दिले होते. एवढंच नाही,तर तिने अमितच्या नावावर जमीन करा, असा दबाव आणू लागली होती. जेव्हा जसवंतने जमीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला असता, तेव्हा पुनिताने हत्येचा कट रचला.

17 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास पुनितने अमित, तिचा भाऊजी राजेश यादव आणि इतर काही मित्रांसह जसवंतला खत आणण्याच्या बहाण्याने बोलावले होते. त्यांनी त्याला शेतात नेले आणि धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला आणि हत्येनंतर मृतदेह एका शिवारात फेकून दिला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp