मांत्रिकाला घरी घेऊन गेली अन् काळ्या जादूच्या नावाखाली... विधी झाल्यानंतर मांत्रिकाने ‘अशी’ गोष्ट लंपास केली की...
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका मांत्रिकाने महिलेला आपल्या गोड बोलण्यात फसवलं. पण भूतबाधेच्या वेळी, मांत्रिकाने महिलेची वस्तू चोरली. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या महिलेला हे कळले तेव्हा तिच्याकडे पश्चात्ताप करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय नव्हता.

बातम्या हायलाइट

भूतबाधेच्या नावाखाली बनावट मांत्रिकाने केला धक्कादायक प्रकार...

विधी झाल्यानंतर मांत्रिकाने ‘अशी’ गोष्ट लंपास केली की...
Crime news: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. एका मांत्रिकाने महिलेला आपल्या गोड बोलण्यात फसवलं. तो पीडितेला म्हणाला की “तुझ्याकडे पैसे असून सुद्धा ते तुझ्याकडे टिकत नाहीत. यासाठी मी काळी जादू करेन. मग पैसे नेहमीच तुझ्याकडे राहतील.” संबंधित महिलेला देखील त्याच्या बोलण्याने खात्री पटली. ती त्याला तिच्या घरी घेऊन गेली. पण भूतबाधेच्या वेळी, मांत्रिकाने महिलेची वस्तू चोरली. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या महिलेला हे कळले तेव्हा तिच्याकडे पश्चात्ताप करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय नव्हता. नेमकं काय घडलं?
आपली फसवणूक झाल्याचं कळताच महिलेने याबद्दल पोलिसांना सर्व काही सांगितलं. पोलिसांनी आता त्या मांत्रिकाचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. संबंधित महिलेचं नाव मीरा असून तिचं भगवानपूरमधील एलएनटी बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजजवळ चहाचं दुकान आहे. तिचं घर समोरच्या आय-जी कॉलनीत आहे. या महिलेनं पोलिसांना सांगितलं की, भूतविद्या करणारा एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या दुकानात येत होता.
हे ही वाचा: मला नोरा फतेहीसारखीच फिगर पाहिजे, पतीची पत्नीकडे मागणी, नंतर रोज तीन तास....पत्नीने गाठलं पोलीस स्टेशन
गोड बोलण्यात फसवलं अन्...
चहा प्यायल्यानंतर सुद्धा तो बराच वेळ दुकानात थांबायचा. त्यावेळी त्याच्याशी बोलताना मीरा म्हणाली की ती बऱ्याचदा आजारी असते. ती पैसे कमवते, पण तिच्या घरात समृद्धी नाही. हे सर्व सांगितल्यानंतर, त्या आरोपीने स्वतः मांत्रिक असल्याचं सांगितले आणि भूतबाधेच्या विधी करून ती पूर्णपणे बरी होईल, असं देखील सांगितलं. ती त्या मांत्रिकाच्या जाळ्यात अडकली आणि काहीही विचार न करता, मीरा त्या मांत्रिकाला तिच्या घरी घेऊन गेली. त्यावेळी त्या मांत्रिकाने मीराला तिचे सर्व दागिने बाहेर काढण्यास सांगितलं.
हे ही वाचा: “काकी, वहिनी तर तुझ्या गर्लफ्रेंड्स... “ बायकोचे ‘ते’ शब्द मनाला टोचले अन् विष पिऊन... सोशल मीडियावर लिहिली ‘ती’ गोष्ट..
लाल कापडात दागिने गुंडाळले
त्यानंतर मांत्रिकाने सर्व दागिने एका लाल कापडात गुंडाळले. काही मंत्रांचा जप केला आणि नंतर ते परत केले. तो म्हणाला की “ते कापड आता उघडू नको. दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर सर्व काही ठीक होईल.” दुसऱ्या दिवशी सकाळी, तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर, मीराने दागिने गुंडाळलेले कापड उघडलं पण त्यात फक्त कागदांचा गठ्ठा आढळला. दागिने गायब होते. दागिने गुंडाळलेले कापड देताना त्या मांत्रिकाने तिच्यावर काही केमिकल फवारलं असावं, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली असा मीराने संशय व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.