“काकी, वहिनी तर तुझ्या गर्लफ्रेंड्स... “ बायकोचे ‘ते’ शब्द मनाला टोचले अन् विष पिऊन... सोशल मीडियावर लिहिली ‘ती’ गोष्ट..
राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका पती आपल्या पत्नीच्या खोट्या आरोपांमुळे इतका नाराज झाला की त्याने विष प्राशन करत आत्महत्या केली. पण हे पाऊल उचलण्यापूर्वी तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात पीडित तरुणाने त्याच्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या सर्व आरोपांबद्दल सांगितलं.

बातम्या हायलाइट

बायकोच्या सततच्या टोमण्यांमुळे वैतागला आणि स्वत:चं आयुष्य संपवलं

सोशल मीडियावर सांगितलं आत्महत्येचं खरं कारण..
Crime News: राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका पती आपल्या पत्नीच्या खोट्या आरोपांमुळे इतका नाराज झाला की त्याने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यामुळे पीडित तरुणाचा मृत्यू झाला. पण हे मोठं आणि भयानक पाऊल उचलण्यापूर्वी तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात पीडित तरुणाने त्याच्या पत्नीने त्याच्यावर केलेल्या सर्व आरोपांबद्दल सांगितलं. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पत्नीसोबत सतत वाद...
हे प्रकरण भरतपूर जिल्ह्यातील उच्चैन पोलीस स्टेशन परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. येथे विष्णू नावाचा एक तरुण त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. विष्णूने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे त्याच्या पत्नीशी सतत वाद होत असायचे. यामुळे वैतागलेल्या विष्णूने अचानक विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवलं.
विष्णूने विष प्राशन केल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यावेळी विष्णूच्या पत्नीला काहीच सुचत नव्हतं. पतीची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून तिने आरडाओरड करत शेजारील लोकांची मदत मागितली आणि आवाज ऐकून परिसरातील लोक विष्णूच्या घरी पोहोचले. त्यानंतर, त्याला ताबडतोब भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: निसर्गापुढे देवाचीही शरणांगती, गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश मूर्ती पाण्याखाली, मूर्तीकारांच्या अश्रूंचा बांधा फुटला
सोशल मीडियावर सांगितलं आत्महत्येमागचं कारण..
याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. प्रकरणाचा तपास सुरू असताना विष्णूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात त्यानं आत्महत्येचे कारण सांगितले असल्याचं आढळून आलं. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “माझी बायको माझी सतत बदनामी करते. मी जसा साधा दिसतो तसा अजिबात नाही, असं ती म्हणते. तिच्या मते, माझे माझ्या काकी आणि वहिनीसोबत प्रेमसंबंध आहेत आणि त्यांच्यासोबत माझे अनैतिक संबंध सुरू आहेत. पण हे अजिबात खरं नाही.”
हे ही वाचा: मुलगी रात्री शेतात बॉयफ्रेंडसोबत... मुलीच्या शोधात वडील पोहोचले अन् नंतर खोट्या अभिमानासाठी मर्यादाच सोडल्या
विष्णूने पुढे पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या पत्नीच्या या खोट्या आरोपांना मी वैतागलो होतो. म्हणूनच आज मी आत्महत्या करणार आहे.” पोलिसांनी सोशल मीडियावरील या पोस्टच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.