निसर्गापुढे देवाचीही शरणांगती, गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश मूर्ती पाण्याखाली, मूर्तीकारांच्या अश्रूंचा बांधा फुटला
Mumbai Heavy Rain Impact : पावसाने रौद्ररुप धारण केल्यानं कारखान्यातील गणेश मूर्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. याचा मोठा फटका हा मूर्ती विक्रेत्यांना बसला आहे. यामुळे आता गणेश मूर्ती विक्रेत्यांच्या डोळ्यात पाणी दिसत आहे.

बातम्या हायलाइट

राज्यभरासह मुंबईत मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातलं

जनजीवन विस्कळीत झालं

गणेश मूर्ती पाण्याखाली

मूर्तीकारांना अश्रूंचा बांधा फुटला
Mumbai Heavy Rain Impact : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरासह मुंबईत मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातलं आहे. तसेच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. याच पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतेय. आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारात गणेश मूर्त्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. मात्र, पावसाने रौद्ररुप धारण केल्यानं कारखान्यातील गणेश मूर्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. याचा मोठा फटका हा मूर्ती विक्रेत्यांना बसला आहे. यामुळे आता गणेश मूर्ती विक्रेत्यांच्या डोळ्यात पाणी दिसत आहे.
हे ही वाचा : "त्यांनाच त्यांची किंमत कळली..." बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा सुफडासाफ, नाव न घेता भाजप नेत्यानं डिवचलं
गणेश कला केंद्रातील गणेश मूर्त्या पाण्याखाली
मुंबईसह ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. याच ठाण्यात ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचाच फटका आता ठाणेकरांना तर बसला आहेच, पण या व्यतिरिक्त सखल भागांमध्येही पाणी शिरल्याचं चित्र आहे. याच ठाण्यातील माजिवाडा गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रातील गणेश मूर्त्या अक्षरश: पाण्याखाली गेल्याचं चित्र समोर आलं आहे.
गेल्या काही महिन्यांची महेनत एका क्षणार्धात पाण्याखाली गेल्याने मूर्ती विक्रेते आणि मूर्तीकारांच्या डोळ्यात पाणी दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असता, मूर्त्यांचं नुकसान झाल्याने मूर्तीकारांसमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे ही वाचा : बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल, साधा भोपळाही फोडला नाही, महापालिका निवडणुकीत विजय अवघड
महिला मूर्तीकाराला अश्रूंचा बांधा फुटला
दरम्यान, महिला मूर्तीकाराने स्थानिक प्रशासनावर खापर फोडलं आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याने गणेश मूर्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ठाणे महापालिका नाले साफ करत नसल्याचं म्हणत महिला मूर्तीकाराने स्थानिक प्रशासनाला काही बाबी विचारल्या आहेत. सध्या येणारे पाणी हे नाल्यातूनच येत असल्याचं महिलेनं सांगितलं आहे. आपली एकूण व्यथा मांडत असताना तिला अश्रू अनावर झाले आहेत.