मला नोरा फतेहीसारखीच फिगर पाहिजे, पतीची पत्नीकडे मागणी, नंतर रोज तीन तास....पत्नीने गाठलं पोलीस स्टेशन

मुंबई तक

Crime News : नवऱ्याने पत्नीकडे नोरा फतेहीसारखे फिगर बनव असा दबाव आणला. त्यानंतर महिलेनं सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याची बायकोकडे अगळी वेगळी अपेक्षा

point

नोरा फतेहीसारखी फिगर कर म्हणाला

point

पत्नीने केले गंभीर आरोप

Crime News : नवरा बायकोने एकमेकांकडे अपेक्षा ठेवणे हे स्वाभाविक आहे. मात्र, कोणाचाही अपेक्षाभंग झाला तर माणूस कधी कोणत्या पातळीवर जाईल हे सांगता येत नाही, नवरा आणि बायकोच्या नात्यातील अशीच एक घटना समोर आली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोला जीममध्ये तीन तास व्यायाम करण्यास सांगितला आणि नोरा फतेहीसारखी फिगर बनवण्यास सांगितली. पत्नीने नवऱ्याच्या मागणीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

हे ही वाचा : बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल.. साधा भोपळाही फोडला नाही, महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका

नेमकं प्रकरण काय? 

घडलेल्या घटनेनुसार, ही घटना मुरादनगर येथील असून तरुणीचा विवाह फिजिकल टिचरसोबत मार्च महिन्यात झाला होता. मुलीने आरोप केला की, तिच्या वडिलांनी तिला 24 लाख रुपयांची महिंद्रा स्कॉर्पिओ, लाखो रुपये आणि दागिने भेट दिले होते. लग्नात 75 लाख खर्च करण्यात आला. हा खर्च करूनही तरुणीचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. 

पत्नीने आरोप केला की, पतीने लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा नवरा माझ्यासोबत झोपला नाही. लग्नापासून माझ्या नवऱ्याचा माझ्याशी असलेला दृष्टीकोन चांगला नाही. माझी उंची फार नाही, माझी फिगर आकर्षक नसून मी दिसायलाही फारशी सुंदरही नाही, यामुळेच मला तो मला रोजच टोमणे मारायचा. त्याच्या कुटुंबातील सदस्यही माझ्याकडून जास्तच हुंडा मागायचे. माझा नवरा मला म्हणायचा की, माझ्याशी विवाह करून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. तो म्हणायचा की मला चांगली नोरा फतेहीसारखी मुलगी मिळाली असती. 

नोरा फेतेहीसारखी फिगर बनवण्याचा नवऱ्याकडून दबाव 

मला नवऱ्याने नोरा फतेहीसारखी फिगर बनव असा अनेकदा दबाव आणला. मी व्यायाम केला नाही,तर माझं जेवण बंद केलं. नंतर विवाहित महिलेनं आरोप केला की, जेव्हा पती एका महिलेसोबत बोलत असताना अनेकदा विरोध केला असता, उलट पतीनेच मारहाण केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp