पोटावर गरम रॉडचे चटके अन् झाडूने मारहाण... भूतबाधेच्या नावाखाली 14 वर्षीय मुलीसोबत धक्कादायक प्रकार
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक खळबळजनक घटना घडल्याचं वृत्त समोर आली आहे. येथे एका मांत्रिकाने केलेल्या विधी दरम्यान एका 14 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

बातम्या हायलाइट

भूतबाधेच्या नावाखाली 14 वर्षीय मुलीसोबत धक्कादायक प्रकार

मुलीच्या पोटावर गरम रॉडचे चटके अन् झाडूने मारहाण...

मांत्रिक विधीमुळे पीडितेचा मृत्यू
Crime News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक खळबळजनक घटना घडल्याचं वृत्त समोर आली आहे. येथे एका मांत्रिकाने केलेल्या विधी दरम्यान एका 14 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेच्या पोटावर गरम रॉडने जळण्याच्या आणि इतर जखमांच्या खुणा आढळून आले आहेत.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सची प्रतिक्षा
मुलीचे कुटुंबीय अंतिम संस्कारासाठी मुलीचा मृतदेह घेऊन जात असताना, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत असून रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
आजारपणाच्या उपचारासाठी मांत्रिकाला बोलवलं
ही संपूर्ण घटना सोमवारी खल्लासीपुरा परिसरात घडल्याची माहिती आहे. पीडितेचं नाव रौनक असून तिच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय कुटुंब तिला अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याची तयारी करत होते. त्यावेळी आठवी इयत्तेत शिकणारी रौनक पाल नावाची विद्यार्थीनीची प्रकृती बिघडली असता तिच्या घरच्यांनी तिला बरं करण्यासाठी मांत्रिकाला बोलवलं असल्याची माहिती एका अज्ञान व्यक्तीने पोलिसांना दिली. मुलीच्या आई-वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार एका मांत्रिकाला बोलावले होतं आणि मुलीला भूतबाधा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा: विधवा महिलेला गरोदर केलं अन् आठव्या महिन्यांतच... सावत्र मुलीला देखील सोडलं नाही, नेमकं काय घडलं?
पोटावर रॉडचे चटके अन् मारहाण...
मांत्रिकाने मुलीच्या पोटावर गरम रॉडने जाळलं असून त्याने तिला काठी आणि झाडूने मारहाण केली. उपचाराच्या नावाखाली झालेल्या या छळामुळे पीडित मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित मुलीला 15 दिवसांपासून ताप असल्याचं पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला डॉक्टरांकडेही नेण्यात आलं होतं, पण तरीसुद्धा तिला आराम मिळत नव्हता. तिच्या आजारपणामुळे सोमवारी तिचा मृत्यू झाला. तांत्रिक विधीबद्दल कुटुंबियांनी काहीही सांगितलेलं नसल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: Mumbai Weather: मुंबईत धो-धो पाऊस पडणार, घरातून बाहेर पडण्याआधी हवामान खात्याचा अलर्ट तर पाहा!
या प्रकरणात, इंदरगंज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खल्लासीपूर येथील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस आता पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत असून त्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.