48 तासांत 'या' भागात तीन भयंकर मोठे हत्याकांड, मुलाने वडिलांवर केले सपासप वार... थरकाप उडवणारी घटना
crime news : सुरतमध्ये 48 तासांमध्ये तीन धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहेत. यामुळे सूरत हादरून गेलं आहे. पोलीस संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं बोललं जातंय.

बातम्या हायलाइट

48 तासांमध्ये तीन धक्कादायक हत्याकांड

15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2.30 वाजताची घटना
Crime News : गुजरातच्या सुरतमध्ये 48 तासांमध्ये तीन धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहेत. यामुळे सूरत हादरून गेलं आहे. पोलीस संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं बोललं जातंय. आजतक या वृत्तमाध्यमानुसार, ही घटना 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2.30 वाजता घडली. खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजा केतनभाई राठोड असे नाव आहे. ही घटना सहारा दरवाजा उमरवाडा टेकरा रेल्वे गरनाला ओव्हरब्रिजखाली घडली. तरुण दोन मित्रांसह झोपलेला असताना त्याचा खून करण्यात आला होता.
हे ही वाचा : मेरठसारखंच प्रकरण! घरावर निळ्या ड्रममध्ये नवऱ्याचा आढळला मृतदेह, पत्नी आणि मुलं बेपत्ता, पुरूषांची चांगलीच टरकली
सूरतमध्ये 48 तासांत तीन हत्याकांड
वृत्तानुसार, एका अज्ञाताने त्याच्या मानेवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले, कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी सरदार बाजारात पोर्टर म्हणून काम करणारा राजा मित्रांसोबत झोपण्यासाठी गेला असताना ही काळिज पिळवटून टाकणारी पहिली घटना उघडकीस आली आहे.
दुसरे हत्याकांड
यानंतर दुसऱ्या घटनेत जीआयडीसीमधील पाली गावातील एका सचिन नवाच्या अल्पवयीन मुलाने शुक्रवारी रात्री त्याचे वडील चेतक राठो़ड यांची चाकूने सपासप वार करत हत्या केली. मुलाला संशय होता की, वडिलांचे शेजारील महिलेशी प्रेमसंबंध आहेत. याचकारणावरून त्यांच्यात वारंवार भांडणं होत होती. शुक्रवारी, मोठा वाद उफळला आणि इतक्यातच मुलाने आपल्या वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर संबंधित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हे ही वाचा : Pune Crime : पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय, नंतर तीन तलाकची केली मागणी, भरचौकातच ब्लेडने तोंडावर केले सपासप वार
तिसरे हत्याकांड
तिसऱ्या घटनेत दिंडोलीतील देलाडवा गावातील शेतातील विहिरीत एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या शरीरावर मान, पाठ, छाती आणि डोक्यावर अनेक ठिकाणी चाकूने सपासप वार करण्यात आले. यामुळे मोठ्या जखमा तयार झाल्या होत्या. त्याची हत्या करून तो दुसरीकडे कुठेतरी फेकून देण्यात आला असावा असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.