3 मुलं असलेल्या महिलेनं प्रियकराच्या मदतीनं 70 वर्षांच्या सासऱ्याला संपवलं! हत्येमागचं कारण वाचून हादरूनच जाल

Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या आगरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेनं प्रियकरासोबत मिळून सासऱ्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

Shocking Murder Case
Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या हत्येप्रकरणी महिला जेलमध्ये गेली होती

point

खूप दिवसांपासून सुरु होतं प्रेमप्रकरण

point

पोलिसांनी दोघांना पकडलं अन्..

Shocking Murder Case : उत्तरप्रदेशच्या आगरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेनं प्रियकरासोबत मिळून सासऱ्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. महिलेला तीन मुलं असून ती पतीच्या हत्येप्रकरणी याआधीही जेलमध्ये गेली होती. ही धक्कादायक घटना आगरा येथील मरौली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. राजवीर सिंह यांचा मृतदेह शेतात सापडल्यानंतर सर्वांनाच हादरा बसला होता. याप्रकरणाची सूचना पोलिसांना देण्यात आली. तपासात समोर आलं की, सून बबलीने तिचा प्रियकर प्रेम सिंहसोबत मिळून हत्येचा कट रचला होता. दोघांनी वृद्धाची गळा कापून हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेतात फेकून दिला.

पतीच्या हत्येप्रकरणी महिला जेलमध्ये गेली होती

आरोपी महिलेचा पती हरीओमची हत्या सहा वर्षांपूर्वी झाली होती. याप्रकरणी पत्नी बबलीला तुरुंगवासही भोगावा लागला होता. बबलीला दोन मुली आणि एक मुलगा होता. बबली जेलमध्ये असताना तिच्या 8 वर्षांच्या मुलाने स्वत:ला संपवलं होतं. घटनेनंतर बबलीने संशय व्यक्त केला होता की, तिच्या मुलाचा मृत्यू सासरच्या लोकांमुळे झाला. यामुळेच तिने गुन्हेगारी सुरु केली.

हे ही वाचा >> "खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही, खांद्यावर बंदूक ठेऊन...",मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नेमकं काय म्हणाले?

खूप दिवसांपासून सुरु होतं प्रेमप्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, बबली आणि प्रेम सिंह यांच्यात खूप दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं. प्रेम सिंह याआधीही अनेक प्रकरणात जेलमध्ये गेला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मुन्नी देवी (मृताची पत्नी) यांना त्यांच्या पुतण्या-पुतणीचं पालन पोषण घरीच करायचं होतं. परंतु, बबली त्यांच्यापासून दूर दिगनेर गावात मुलांसह भाड्याने राहत होती. हा वादविवाद सोडवण्यासाठी राजवीर सिंह यांना घरीच बोलावलं होतं. पण त्यांची हत्या करण्यात आली होती. 

हे ही वाचा >> नात्याला काळिमा! लेकाचा आईच्या चरित्र्यावर संशय, नंतर स्वत:च केले लैंगिक शोषण, हादरवून टाकणारी घटना

पोलिसांनी दोघांना पकडलं अन्..

वृद्धाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि बबलीला अटक केली. तिचा प्रियकर प्रेम सिंहलाही बेड्या ठोकल्या. प्रेम सिंह आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत प्रेमच्या पायाला गोळी लागली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp